नाशिक - फार्मसी विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या ‘फार्मसी वीक’चे आयोजन इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन नाशिकने केले होते. यामध्ये सलग तिसऱ्यांदा मानाची चॅम्पियनशिप ट्रॉफी मिळवण्याचा मान डिप्लोमा महाविद्यालय गटात एशियन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पाथर्डी फाटा, तर डिग्री महाविद्यालय गटात एमजीव्ही कॉलेज ऑफ फार्मसी, पंचवटी यांनी मिळवला. हॅट््ट्रिक करणारी ही दोन्ही महाविद्यालये ३३ महाविद्यालयांतून पुन्हा एकदा निवडून आली असून, विद्यार्थ्यांत यानिमित्त जल्लोष पाहायला मिळाला.
इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनतर्फे आयोजित फार्मसी वीकच्या पारितोषिक वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दि. जानेवारी रोजी दुपारी हा कार्यक्रम दादासाहेब गायकवाड सभागृह येथे पार पडला. या पारितोषिक वितरणामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे द्वितीय क्रमांकाचे विजेते डिप्लोमा विभागातून मविप्रचे फार्मसी महाविद्यालय आडगाव, तर डिग्री विभागातून मेट कॉलेज ऑफ फार्मसी यांना देण्यात आले. दि. ते जानेवारीदरम्यान हा सप्ताह साजरा केला जातो. या सप्ताहामध्ये फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ, सांस्कृतिक स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, नृत्य स्पर्धा, ट्रेकिंगसारख्या स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्व स्पर्धांमध्ये एकूण ३३ नाशिक विभागातील महाविद्यालये सहभागी झाली होती. विद्यार्थ्यांना सादरीकरणाची संधी बक्षीस वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमात देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्य आणि गाणी सादर केली.
एमजीव्ही संचलित पंचवटी फार्मसी महाविद्यालयाने सलग तिसऱ्यांदा जनरल चॅम्पियनशिपचा किताब पटकावला.