आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षीमित्रांनी वाचविला फ्लेमिंगो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- एक फ्लेमिंगो (रोहित) पक्षी पतंगाच्या मांजात अडकून जखमी झाला असता नाशिकच्या पक्षीमित्रांनी योग्य उपचार करून त्याला जीवदान दिले.

दारणा धरणाच्या दिशेने जाताना वडनेर येथे हा पक्षी जखमी झाला. पंखांना गंभीर इजा झाल्याने अविनाश सुदाम पोरजे यांच्या मळ्यात तो पडला. सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास योगेश पोरजे यांच्या तो दृष्टीस पडला. त्यांनी तत्काळ वनअधिकारी व पक्षीमित्रांना माहिती दिली. पक्षीमित्र शेखर गायकवाड यांनी प्रशांत भवर यांना पाठवले. डॉ. संजय गायकवाड यांनी उपचार केले. फ्लेमिंगोच्या पंखांना नऊ टाके घालण्यात आले. हा पक्षी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

राजमाता जिजाऊ जलतरण तलावातील प्रेक्षक गॅलरीत नायलॉन मांजाच्या विळख्यात अडकून तडफडणार्‍या पारव्याची कर्मचार्‍यांनी सुखरूप सुटका केली. सकाळी 7 वाजेच्या सुमारास मांजाच्या विळख्यात पारवा अडकल्याचे व्यवस्थापक माया जगताप यांच्या लक्षात आले. त्यांच्या सूचनेनुसार सुमारे पाच फुटांवर अडकलेल्या पारव्याची रवींद्र केदारे, दिलीप मोरे, कचरू मुसळे, पिंटू तांबोळी, आकाश चंडालिया, आशिष भडांगे, अमन चंडालिया यांनी सुटका केली.