आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोटो सर्कल उलगडणार नाशिकची संस्कृती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील काही पुरातन वास्तूंवरील रेखीव नक्षी, त्यांची वैशिष्ट्यपूर्ण बांधकामे, जुन्या वाड्यांचा टुमदार दिमाख, मंदिरांच्या सुरेख खिडक्या, गोदाघाटाच्या दगडी पायऱ्या सर्वांनाच भुरळ घालणाऱ्या आहेत. ही समृद्ध संपत्ती गुरुवारी ‘फोटो सर्कल नाशिक’च्या कॅमेऱ्यामध्ये कैद होणार आहे. नाशिकच्या नव्या-जुन्या, अनुभवी फोटोग्राफर्सने एकत्र येऊन स्थापन केलेल्या फोटो सर्कलतर्फे यासाठी ‘फोटोवॉक’चे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमात फोटोग्राफर्स पोर्टेट, लँडस्केप, मंदिरांचे किंवा जुन्या इमारतींचे फोटो काढणार आहेत. राज्यात केवळ नाशिकमध्येच धूलिवंदनाला वीर नाचवण्याची प्रथा आहे. हे अाैचित्यही कॅमेऱ्यात कैद करण्यात येणार आहे. हाेतकरू फोटोग्राफर्सचा रस्त्यावर फोटोग्राफी करण्याचा न्यूनगंड जावा, हादेखील हेतू यामागे आहे. मुळात, प्रत्येक नाशिककर किंवा फोटोग्राफी आवडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी ही नामी संधी आहे. पायी फिरून जुन्या नाशकातील इमारतींचा अभ्यास करणे, गोदाकाठी असलेली संस्कृती अभ्यासणे, घरांची ठेवण, नव्या आणि जुन्या पद्धतींचा मेळ अशा सगळ्या गोष्टी यात शिकायला मिळणार आहेत.

या संकल्पनेमागे नाशिकमधील सर्वच फोटोग्राफर्सना एकत्र आणण्याचा मुख्य हेतू असल्याचे फाेटाे सर्कलतर्फे सांगण्यात अाले. संध्याकाळी ते या वेळेत हा वॉक होणार आहे. वयाचे किंवा अनुभवाचे कोणतेही बंधन या फोटोवॉकसाठी नाही. तसेच, सर्वांसाठी मोफत असलेल्या या इव्हेंटमध्ये फोटोग्राफर्सच्या दाेन टिम्स त्यांच्या संकल्पनांनुसार नाशिकचे चित्रण करणार आहेत. यशवंतराव महाराज पटांगण येथील देवमामलेदार मंदिराजवळ एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यानंतर जुन्या नाशिकमध्ये म्हणजेच मूळ गावात फिरण्याची सुुरुवात केली जाईल.

नाशिकच्या सर्वात समृद्ध भागात वाॅक...
^बऱ्याचदा स्ट्रीट फोटोग्राफी किंवा चालता चालता आवडलेली एखादी फ्रेम व्यक्तिकेंद्रित असली तर ती टिपण्यास फोटोग्राफर्स बिचकतात. यासाठी पर्याय म्हणून नाशिकच्या सगळ्यात जास्त समृद्ध भागात फोटोवॉकची सुरुवात करण्याचे ठरले. जुने वाडे, भिंती, दरवाजे, खिडक्या, घरांवरील लाकडी कोरीव काम, नक्षीकाम यासारख्या गोष्टी त्यांनी स्वत:च्या कल्पनेने, त्यांच्या दृष्टीतून टिपणे अपेक्षित आहे. यावेळी त्यांना तज्ज्ञांची योग्य फ्रेम निवडण्यास मदत मिळणार आहे. - स्वप्नील जोशी, फोटोसर्कल
बातम्या आणखी आहेत...