आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकतर्फी भूसंपादन केले तर अात्मदहन करणार, पिंपळगाव खांब गावकऱ्यांचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पिंपळगाव खांब येथील मलनि:सारण केंद्राचा वाद चिघळण्याची शक्यता असून, गुरुवारी (दि. १०) भूसंपादनासाठी अंतिम माेजणी हाेणार असताना प्रत्यक्षात येथे महापालिकेसह अन्य यंत्रणेचे अधिकारीच पाेहोचले नाहीत. दरम्यान, अंतिम माेजणीला गावकऱ्यांचा विराेध सुरू झाला असून, एकतर्फी भूसंपादनाचा प्रयत्न झाल्यास स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 
 
केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून गंगापूर केंद्रापाठाेपाठ पिंपळगाव खांब येथील जागा संपादनासाठी प्रयत्न सुरू झाले अाहेत. गंगापूर मलनि:सारण केंद्रांचे काम सुरू झाले अाहे. इकडे, पिंपळगाव खांबसाठी दोनच दिवसांपूर्वीच शासनाच्या तांत्रिक समितीने ५६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. पिंपळगाव खांब येथे पाच हेक्टर भूसंपादन करण्याचे नियोजन असून, त्यासाठी गुरुवारी अंतिम मोजणी हाेणार हाेती. सुमारे दीडशे शेतकऱ्यांना नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या. रेडीरेकनरनुसार आरक्षित भूखंड ताब्यात घेताना शेतकऱ्यांना अडीचपट मोबदला देण्याचा निर्णय झाल्यानंतर पुन्हा पाचपट मोबदला मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाचा अंतिम निकाल स्थानिक शेतकऱ्यांना मान्य असेल, तत्पूर्वी भूसंपादनाचा निर्णय घेतल्यास आत्मदहन करू, असा इशारा भिवा बोराडे, देवराम बोराडे, सुकदेव बोराडे, कचरू बोराडे, गोपाळा बोराडे, दत्तू बोराडे, रामदास बोराडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. 
 
..तर अंतर्गत मलनिःस्सारणासाठी दिडशे काेटी 
पिंपळगावखांब मलनि:सारण केंद्रांचा विषय व्यवस्थित मार्गी लावला तर, राज्य शासनाच्या तांत्रिक समितीने नाशिकमधील नववसाहतींसाठी नवीन भुयारी गटार याेजना राबविणे तसेच, जुन्या भुयारी गटार याेजनेच्या दुरूस्तीसाठी निधी देण्याची तयारी दाखवली अाहे. जवळपास दिडशे काेटी रूपये या माध्यमातून मिळणे अपेक्षित असून, त्याबाबतचा प्रकल्प अहवाल पाठवण्याची तयारी सुरू झाल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली. त्यामुळे पिंपळगाव खांबचा प्रकल्प प्राधान्याचा प्रतिष्ठेचा विषय ठरणार अाहे. 
बातम्या आणखी आहेत...