आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारांना पिस्तूल आणि काडतूस विकणारा जेरबंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गुन्हेगारांना पिस्तूल, काडतूस विकणाऱ्यास भद्रकाली पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि. ९) जेरबंद केले. संशयिताने सराईत गुन्हेगारांना पिस्तूल विकल्याची कबुली दिली असून, पिस्तूल बाळगणाऱ्यांची नावे सांगितली.
माहितीनुसार पौर्णिमा बसथांबा परिसरात सोमवारी रात्री संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या तरुणास पोलिसांनी हटकले असता पळाला. पाठलाग करून त्याला थोड्या अंतरावर पकडले. अंगझडतीत कमरेला गावठी पिस्तूल अाढळले. त्याने राहुल संदीप सोनवणे (वय २५, रा. अरिंगळे मळा, सिन्नरफाटा) असे नाव सांगितले. शहरात पिस्तूल बाळगणाऱ्या संशयितांवर कारवाई झाली, मात्र त्यांनी पिस्तूल विकणारा पहिल्यांदाच पकडला आहे. सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे, वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, उपनिरीक्षक हनुमंत वारे, विजू लोंढे, कविश्वर खरोटे, मनोज डोंगरे यांच्या पथकाने कारवाई केली.
फरार संशयित जेरबंद : लासलगावयेथे व्यापाऱ्यावर गोळीबार करून फरार झालेल्या संशयिताविरुद्ध लासलगावला गुन्हा दाखल आहे. कारवाई पूर्ण झाल्यानंतर त्यास लासलगाव पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.

मोठे रॅकेट उघड होणार
- शहरात शस्र बाळगणाऱ्यांवर कारवाई सुरू असून, पकडलेल्या संशयितांकडून पिस्तूल बाळगणाऱ्यांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. त्यातून मोठे रॅकेट उघडकीस येणार आहे.
सचिन गोरे, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे शाखा)