आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादाशिवाय... तिथे काय...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सार्वजनिक वाचनालयाची सभा म्हणा की, एखादी बैठक म्हणा काही माेजकी डाेकी साेडली तर एकच सूर उमटताे‘वादाशिवाय... तिथे काय...’ अाता अाज हाेणारी सावानाची सभाही याच सूराभाेवती फिरली नाही तर मिळवलं. १७५ वर्षे पूर्ण केलेल्या सावानाने हेच वर्ष सादर करताना सावानातील विविध विषयांची लख्तर करत ती वेशीवर टांगली. त्यावेळी एकाही पदाधिकाऱ्याला काहीच वाटले नाही.
 
अाता पुन्हा रविवारी (दि. ५) विशेष सर्वसाधारण सभा बाेलावण्यात अालेली अाहे. या सभेबाबतही अनेक जणांना साशंकताच अाहे. ही सभाही वादाशिवाय पार पडते का? याचीच अाता सभासदांना उत्सुकता लागलेली अाहे. सावाना म्हटलं की, वाद... हे समिकरण एवढे दृढ का झाले याचा विचार या निमित्ताने पदाधिकाऱ्यांनी करणे गरजेचे अाहेे.
 
माजी पदाधिकारी, अाजी पदाधिकारी, काढून टाकण्यात अालेले पदाधिकारी अाणि कारवाई झालेले पदाधिकारीही. पूर्वी सावाना म्हटलं की, साहित्य क्षेत्रात गर्वाने नाव घेतले जात हाेते.सरस्वतीचे माहेरघर म्हणून त्याकडे बघितले जात हाेते. अाता त्याच सावानाचे नाव घेतले तर शहरातील अनेकजणांच्या कपाळावर अाठ्या येतात, काही जण तर नाके मुरडतात.
 
पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत तर ‘सारे एकाच माळेचे मणी’ हा सूर कायम असताे. कुसुमाग्रजांनी माेठ्या विश्वासाने ही संस्थां नाशिकच्या धुरीणांच्या हाती दिली हाती. या धुरीणांनीही त्याचे चीज करत अाता-अातार्यंत ती सांभाळली. 
 
पण नवा गडी नवा राज या उक्तीप्रमाणे या नव्या गड्यांनी ही संस्था पुरी खिळखिळी करून टाकली. यातील काही जणांच्या स्वाभिमानापाई )यापेक्षा इगाे म्हटलं तर अधिक याेग्य ठरेल) संस्थेचा नावलाैकिक राज्यभर रसातळाला गेला. अाता कुठेही साहित्य वर्तुळात गेलं की, लाेक म्हणून लागतात ‘काय म्हणतात तुमच्या सावानातील वाद...’
 
असा कुलाैकीक या पदाधिकाऱ्यांनी सावानाला मिळवून दिला अाहे. सावानाच्या इतिहासात डाेकावले तर खूप कमी वेळा विशेष सभा घ्यावी लागली अाहे. यंदाची वार्षिक सर्वसाधारण सभा जशी एेतिहासिक ठरली तशीच ही विशेष सर्वसाधारण सभाही एेतिहासिकच म्हणावी लागेल. कारण याच वार्षिक सभेतील विविध विषयांवर विशेेष सभेत निर्णय हाेऊन अनेक विषयांना एकतर पूर्णविराम तरी दिला जाईल किंवा एकतर काही विषय न्यायप्रविष्ट तरी केले जाणार अाहेत.
 
यातील महत्त्वाचा विषय म्हणजे तत्कालिन कार्याध्यक्षा विनया केळकर, कार्यवाह मिलिंद जहागिरदार अाणि अर्थसचिव स्वानंद बेदरकर यांनी कामात अनियमितता दर्शविली असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचा ठपका ठेवत त्यामुळे त्यांच्या कामाचे स्पेशल अाॅडिटर नेमून त्याचा अहवाल येईपर्यंत त्यांचे प्राथमिक सदस्यत्त्व निलंबित करण्यात यावे हा अाहे. अर्थातच दाेन गटांमुले या तिघांचे अाता निलंबन हाेईल यासाठीच ही सभा घेण्यात येत अाहे, एवढे समजण्याइतका सावानाचा सभासद दुधखूळा नक्कीच नाही. 
 
याशिवाय भ्रष्टाचाराचेही अाराेप अाहेतच. त्यावरही या सभेत चर्चा हाेणारच अाहे. (चर्चा की, वाद हा प्रश्नच अाहे.) पण हा सगळा प्रकार म्हणके केवळ अरे ला कारे अाहे हे शहरातील सगळ्याच साहित्य रसिकांना अाणि सावानाच्या सभासदांनाही माहिती अाहे. हे अरे ला कारे करण्यासाठी विविध विषय अजेंड्यावर अाहेतच. 
 
नुतनीकरण करण्यात अालेल्या कामांची कामनिहाय तपासणी गर्व्हनमेंट अप्रुव्हड व्हॅल्युअर अार्किटेक्टमार्फत करावी, नुतनीकरर कामात झालेल्या अार्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी धर्मदाय अायुक्त कार्यालयामार्फत तपासणी करून जबाबदारीन निश्चित कराव.
 
वास्तुविशारदामार्फत कामनिहाय तपासणीसाठी तसेच धर्मदाय अायुक्त कार्यालयामार्फत करण्यात यावयाच्या हिशेब तपासणीसाठक्ष येणाऱ्या खर्चास मंजूरी, मुक्तद्वार विभागाव झालेला खर्च जहागिरदार यांच्याकडून वसूल करण्यासाठी कारवाई करावी हे विषय या विषेश सर्वसाधारण सभेसाठी ठेवलेलेच अाहेत. अर्थात या विषयांवर काय निर्णय हाेणार हे सर्वश्रुत अाहेच. कारण अाता अाहेत सावानाच्या निवडणुका. 
 
सध्या असलेल्या पदाधिकाऱ्यांना अाणि त्यांच्या जवळच्या समर्थकांना पुन्हा निवडूून येण्यासाठीच हा खटाटाेप सुरु अाहे हे प्रयत्न काही संस्थेच्या हितासाठी नाही हे काही सभासदांपासून लपून राहिलेले नाही. सभासद अाता याविषयी उघडपणे बाेलू लागले अाहेत. लवकरच सावानाची निवडणूक लागेल. त्यात अापणच कशी सावानाची स्वच्छता केली, किंवा अामच्यावरच कसा अन्याय झाला हे दाखविण्याचा पुरेपूर प्रयत्न हाेईल. 
 
त्याचा परिणाम मतदान कमी हाेण्यावर हाेणारच अाहे. अर्थातच मतदान कमी हाेवाे वा अधिक हाेवाे शेवटी जाे अधिक मते घेणार ताे लाेकशाहीत निवडून येताे. त्यामुळे ज्याच्या कार्यकाळात अधिक सभासद नाेंदणी (अर्थात त्यांच्या जवळच्या व्यक्तींची) ताे निवडून येणार हे उघड अाहे.
 
 
मग हा खटाटाेप का? अाणि कशासाठी हा प्रश्न अाहेच. असे अनेक प्रश्न खरंतर सावानाच्या बाबतीत अाहेत की, त्या विषयांना अाणि ‘वादाशिवाय... तिथे काय...’ या विचारालाही पूर्णविराम लागावा हीच अपेक्षा सावानाचे सभासद अाणि नाशिककर करत अाहेत. एवढे जरी पदाधिकाऱ्यांनी लक्षात ठेवले तरी गेलेला लाैकिक पुन्हा मिळेल. 
बातम्या आणखी आहेत...