आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एखादे पान, एखादे फूल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या झाडाला अनेक पाने असतात पण फुलं मात्र माेजकी असतात वा पानांच्या तुलनेने कमीच असतात. असे असूनही त्या फुलांकडेच लक्ष वेधले जाते. त्यांचा रंग, त्यांचा अाकार, त्यांचे साैदर्य असे सगळेच खुणावणारे असते. पानांतही साैदर्य असतेच, पण फुलांपुढे ते फिके पडते हे नाकारता येत नाही... पानं झाडावरचं अापलं अस्तित्व टिकवून असतात, फुलं मात्र साैंदर्यरसिकांच्या अाेंजळीत जातात, मनात जातात... हा हंगाम येताे अाणि जाताे... एखादं पान, एखादं फूल एखाद्या घटनेप्रमाणे लक्षात रहातं. म्हणूनच कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रणााच्या शीर्षकाची इथे अाठवण हाेते. पान हसत-हसत अानंद व्यक्त करत असतं, पण त्याला काेणी खुडून अानंदाने घेऊन जात नाही, पण फुलाचं तसं नसतं, फूल अानंदाने जवळ बाळगलं जातं, त्याला पसंती दिली जाते, पुन्हा नवे फूल येण्याची वाट बघितली जाते. सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीतही दाेन पॅनलचे हेच झाले. एक पॅनल एक जागा साेडून निवडून अाले तरी त्याचे पानच राहिले, पण दुसऱ्या पॅनलचा एकच उमेदवार निवडून अाला पण तरीही त्याला फुलाचे स्थान दिले गेले... 
 
असे का झाले याचा विचार अाता पानांनी करायला हवा तर फुलांनीही अापण पूर्णत: का उमलू शकलाे नाही याचे चिंतन करायला हवे. पान अनेक दिवस झाडावर असते त्यामुळे ते टवटवीत असणारच. तसेच सत्तेतील माणसांना यंत्रणा मिळते. मग त्यामागे सगळंच येतं, ते ग्रंथमित्र पॅनलला मिळालं हे सगळीकडेच घडतं, तेच इथेही घडलं, त्यात नवीन काहीच नाही पण, फुलांना मात्र स्वत:चे अस्तित्व टिकविण्यापासून झगडावंच लागतं ती गत झाली जनस्थान पॅनलची. असे का झाले? सगळ्यांची पसंती असतानाच फुलाची कळी असतानाच का खुडले गेले हा विचार महत्वाचा ठरताे. एकतर मुळातच फुल नाजूक असते. तसेच या पॅनलचेही झाले. पॅनल नाजूक हाेते असे म्हणणे चुकीचे ठरेल, पण पॅनलमधील चेहरे नवीन हाेते म्हणून पॅनल नाजूक ठरले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. शिवाय पूर्वतयारीला दिलेला खूप कमी वेळ, एक उपाध्यक्ष अाणि मुख्य म्हणजे अध्यक्षपदाचा उमेदवारच नसणे, थाेडक्यात पॅनल लंगडे पडणे, नियाेजनाचा अभाव, विराेधक करत असलेल्या प्रचाराकडे झालेले दुर्लक्ष अशा अनेक बाबी जनस्थानचे फूल उमलायला कमी पडल्या. तेच ग्रंथमित्रांमध्ये अनुभवींचा भरणा, राजकारणी वृत्ती, सत्तेचा काैशल्याने केलेला वापर, प्रचारातील ‘जनस्थान म्हणजे जहागिरदारांचे पॅनल’ हा महत्वाचा मुद्दा अाणि अापापल्या काळात केलेली सभासद नाेंदणी ही बाब जमेची ठरली अाणि विजय मिळाला. 

हा विजय मिळाला पण ताे सहज मिळाला नाही. सुरुवातीला या पॅनललाही अापण सहज निवडून येऊ असेच वाटले हाेते. पण, तसे झाले नाही. जनस्थानचा वाढता प्रचार बघून ग्रंथमित्रांना सभासदांचे उंबरठे झिजवावे लागले. घाम फुटला, वारं कुठल्या दिशेेला अाहे हे पानांनाही कळलं नाही अाणि फुलांनाही. 
 
शेवटी विजय जरी पानांचा झाला असला तरी फुलांबद्दलची हळहळ अाजही अनेकांमध्ये व्यक्त हाेते अाहे यातच विजय अधाेरेखित हाेताे. एका फुलाने या पानांमध्ये अापलं साैंदर्य दाखवून दिलं. पण, पानांना ते मान्य नाही असेच दिसते. अर्थात धनंजय बेळे एका मताने निवडून अाले पण, बी. जी. वाघ यांनी फेरमतमाेजणी मागितली. बेळेंनी नंतर घटनेवर बाेट ठेवत २४ तास उलटल्यावर मतमाेजणीचा अधिकार राहात नाही, असा अर्ज करत अाक्षेप घेेतला. माेठाच काथ्याकूट हाेऊन मग १८ जण निवडून अाल्याचे पत्र देण्याची उपरती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना झाला. 
 
संपूर्ण निवडणूकीत अत्यंत अाक्षेपार्ह काय हाेतं ते तर निवडणूक निर्णय अधिकारी. असे अधिकारी कधीही नसावे अशी प्रतिक्रिया उमटावी एवढे त्यांचे कामकाज अाक्षेपार्ह झाले. मतदार यादीपासूनच याला सुरुवात झाली. त्यांनी यादीतील नावे तपासून घेतलीच नाही. कार्यकारी मंडळाने जी यादी दिली तीच अंतिम. पण ती तपासण्याची त्यांनी तसदीच घेतली नाही. छाेट्या-छाेट्या बाबी ते अध्यक्षांना विचारत हाेते, तसे बघितले तर अध्यक्ष अाता काळजीवाहू राहिले हाेते, मग त्यांना अधिकारच नव्हता. पण निवडणूक अधिकारी त्यांच्या सल्ल्याशिवाय वा त्यांनी काही सांगितल्याशिवाय पुढे काही करतच नव्हते. अनेक निवडणुकांमध्ये अधिकारी राहिलेले असे कसे करू शकतात असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. मी काय करू, तुम्हाला जे करायचे ते करा, मी काय करणार, हा माझा मित्र अाहे, ताे माझा मित्र अाहे असे निवडणूक अधिकारी कसे म्हणू शकतात. शेवटपर्यंत त्यांची असलेली भूमिका चर्चेत राहिली. अनेकांनी फक्त त्यांच्या वयाचा विचार करता थाेडे नम्र घेतले, पण ही एका माेठ्या संस्थेची निवडणूक अाहे, ती एक प्रतिष्ठेची प्रक्रिया अाहे याचा मात्र अधिकाऱ्यांना विसर पडत हाेता. फेरमतमाेजणीच्या प्रक्रियेवेळी तर त्यांना उद्विग्न हाेण्याची वेळ अाली हाेती. सुरुवातीपासूनच त्यांनी त्यांचा तराजू एका बाजूला झुकवला नसता तर शेवटी त्यांच्या कामात अशी पानगळ दिसली नसती. 
 
पानांना कायम झाडावरच रहायचे असते. ते कशाचातरी अाधार घेतच असतात. तेच ग्रंथमिांनी केले. त्यांनी कायम निवडणूक अधिकाऱ्यांचा अाधार घेतलाच अाणि त्यांनीही तसा अाधार दिला शेवटपर्यंत. विशेष म्हणजे हे लपून राहिले नाही. त्यामुळेच जनस्थानच्या फुलांना सहानुभूतीही मिळत गेली. जनस्थानच्या प्रत्येक उमेदवाराने ५०० मतांच्या पुढचाच टप्पा गाठला. काहींना सातशेहून अधिक मते मिळाली. विभागली मते ती परिवर्तन पॅनलमध्ये. पण तरी जनस्थानला मिळालेली मते काय सांगतात हे लक्षात घेतले पाहिजे. ती मते काेणी दिली हे देखील बघितले पाहिजे. ती मते जुन्या अाजीव सभासदांची हाेती हे नाकारता येत नाही. कारण जुन्यांना बदल हवा हाेता हे त्यांनी व्यक्त केले हाेते. अाणि ग्रंथमित्रांची मते ही बऱ्याच प्रमाणात नव्याने नाेंदणी झालेली हाेती. हे अाता काेणीही सांगेल. पण, अाता जे झाले ते झाले, जनस्थानच्या एका फुलाला पानांनी सामावून घेतले. अाता झाडालाही शाेभा अाली असेच म्हणावे लागेल. सामावून घेणं यात माेठेपणा असताेच. अर्थात या एका फुलाचा अद्यापही संघर्ष सुरू अाहेच. पण, या पानाफुलांच्या वादात सभासदांनी टाकलेल्या विश्वासाला तडा गेला नाही तरच मिळविले अन्यथा अाहेच... तेच झाड अन‌् पाडापाड...
बातम्या आणखी आहेत...