आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दृष्ट लागतील असे रस्ते, नियमांसह हिरवाईची झालर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- रस्तेहे खड्ड्यांसाठीच प्रसिद्ध असतात, हा समज खाेडून काढत अादर्श पद्धतीचे रस्ते जगात ठिकठिकाणी अाहेत. त्यात युराेपमधील रस्त्यांचे नाव प्राधान्यक्रमाने घेतले जाते. भारतातही नवी दिल्ली, चंदिगड, गांधीनगर, बंगळुरू अादी शहरांमधील रस्ते नियाेजनबद्धरीतीने तयार केले अाहेत. नाशिकचा विचार करावयाचा झाल्यास चांडक सर्कल ते मुंबई नाका परिसरापर्यंतचा रस्ता सर्वाेत्तम म्हणावा असा अाहे. सर्व रस्त्यांचे व्यवस्थित डांबरीकरण वा काँक्रिटीकरण केलेे अाहे. शिवाय, रस्त्यांच्या बाजूला पदपथ अाणि बाजूला झाडे अाहेत. त्यामुळेच हे रस्ते अन्य रस्त्यांपेक्षा सरस ठरले अाहेत.
रस्ता, पदपथ अाणि झाडांचे याेग्य संतुलन; चांगल्या रस्त्यांवर अपघातांचे प्रमाणही कमी, परदेशासह भारतातही भरपूर ठिकाणी चांगले रस्ते आहेत.
चंदिगडला रस्तेही शास्त्रशुद्ध
चंदिगडची रचना अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्यात अाली अाहे. या शहरात लावण्यात अालेल्या झाडांच्या बाबतीतही सर्वच नियमांचे पालन करण्यात अाले अाहे. तसेच, दाेन झाडांमध्ये याेग्य पद्धतीने अंतर ठेवण्याचेही भान राखण्यात अाले अाहेे. विकासकामे अाणि पर्यावरणाचे याेग्य संतुलन या शहरात साधण्यात अाल्याचे दिसते. याच पद्धतीने नवी दिल्ली, गांधीनगर अाणि बंगळुरू येथेही लावण्यात अालेल्या झाडांना शास्त्रीय अधिष्ठान देण्यात अाले अाहे.
नाशिकमध्येही अाहेत उत्तम रस्ते
नाशिक शहरात चांडक सर्कल ते मुंबई नाका परिसरातील रस्ता अतिशय नियाेजनबद्धरीतीने तयार करण्यात अाला अाहे. या रस्त्याच्या दुतर्फा पदपथ अाहेत. तसेच, मध्यभागी असलेल्या दुभाजकांत झाडे लावण्यात अाली अाहेत. पदपथांच्या बाजूला झाडे असल्याने वाहतुकीला ते अडथळा ठरत नाहीत. या झाडांमुळे दुपारच्या वेळी रस्त्यावर गारवा जाणवताे. अशाच प्रकारे गंगापूरराेडवरील विद्याविकास सर्कल ते काॅलेजराेड हा रस्ताही असाच अादर्श म्हणावा असा अाहे.
युराेपमधील रस्ते जगात सर्वाेत्तम मानले जातात. येथील रस्ते मोठे असतातच; पण फुटपाथही प्रशस्त, बसस्टॉपचे शेड्स व्यवस्थित असतात. फुटपाथपासून काही अंतरावर हिरवीगार झाडे असतात. शहरात, शहराबाहेर, वस्ती नसलेल्या जंगलातील हायवेवरही पांढरे-पिवळ्या रंगाचे पट्टे मारलेले असतात. पिवळा पट्टा तो रस्ता ओलांडू नये, यासाठी असतो. रस्त्यांवरचा वेग आणि चिन्हांतून दिलेल्या सूचना पाळल्या जातात. त्यामुळे तिथे अपघात हा प्रकार जवळजवळ नाहीच.