आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी माहितीअभावी रखडले नियाेजन...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- जुलैचा दुसरा अाठवडा उलटत अालेला असतानाही पावसाचा पत्ता नसल्यामुळे धास्तावलेल्या महापालिकेने पाणीकपातीचा विचार सुरू केला असला तरी, गंगापूर धरण समूहातील नेमका पाणीसाठा अारक्षणाचा कालावधी संपल्यानंतर महापालिकेच्या वाट्याला येणाऱ्या पाण्याची माहितीच पाटबंधारे खात्याकडून मिळत नसल्यामुळे करायचे काय, असा पेच पालिकेसमाेर उभा राहिला अाहे. दरम्यान, पाटबंधारे खात्याच्या अहवालानंतर पाणीकपातीबाबत अायुक्तांना प्रस्ताव पाठवला जाईल, असे पाणीपुरवठा विभागातील सूत्रांचे म्हणणे अाहे.
गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे उन्हाळ्यात पाणीकपातीचे संकट टळले हाेते. यंदा जूनमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळे यंदा पाणीकपातीचा सामना करावा लागणार नाही, अशी अाशा व्यक्त हाेत हाेती. मात्र, त्यानंतर पावसाने अाेढ दिली. तसेच, गंगापूर धरण समूहातील महापालिकेच्या पाणी अारक्षणाचा कालावधीही संपत अाला अाहे. दरवर्षी १५ अाॅक्टाेबर ते १५ जुलैपर्यंत धरणनिहाय पाणी अारक्षण निश्चित केले जाते. १५ जुलैला महापालिकेचे पाणी अारक्षण संपुष्टात येणार असले तरी, धरणातील पाण्यावरचा हक्क कायम असणार अाहे. मात्र, गंगापूर धरण समूहातील पाण्याबाबत नेमकी स्थिती लक्षात घेऊन त्या अहवालाअाधारे पाणीपुरवठा विभागाने कपातीबाबत निर्णय घेण्याची भूमिका घेतली अाहे. त्याअनुषंगाने पाटबंधारे खात्याला पाणीसाठ्याची स्थिती नियाेजनाची माहिती द्यावी, अशी मागणी पालिकेने केली हाेती. त्यास उत्तर मिळत नसल्यामुळे महापालिकेचे नियाेजन रखडल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे.

धरणातील पाण्याची स्थिती
गंगापूर- २२७६ दशलक्ष घनफूट (४० टक्के)
कश्यपी - ३९९ दशलक्ष घनफूट (२२ टक्के)
गाैतमी गाेदावरी - १५५ दशलक्ष घनफूट (८ टक्के)
दारणा - ३८१८ दशलक्ष घनफूट (५२ टक्के)

छुप्या पाणीकपातीची चर्चा
पावसाअभावीयेत्या काळात पाण्याचा जपून वापर करणे क्रमप्राप्त असताना, प्रशासनाने नानाविध कारणे दाखवून छुपी पाणीकपातही सुरू केल्याचे अाराेप केले जात अाहेत. दाेन िदवसांपूर्वी पंचवटी प्रभाग समिती सभापती सुनीता शिंदे यांनी त्यांच्या प्रभागात कमी दाबाने तसेच एकवेळेस पाणीपुरवठा हाेत असल्याची तक्रार केली हाेती. सिडकाे, सातपूर भागातील नगरसेवकांनी यापूर्वीच कमी दाबाने अपुरा पाणीपुरवठा हाेत असल्याची तक्रार केली हाेती.

कुंभमेळा ठरणार तारणहार
महापालिकाक्षेत्रासाठी साधारण दिवसाला ४०० दशलक्ष लिटर पाणी लागते. त्याअनुषंगाने महापालिकेने नियाेजन करून यंदा ४५०० दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा अारक्षित केला हाेता. त्यात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ५०० दशलक्ष घनफूट पाणीसाठाही अतिरिक्त अाहे. एकूणच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पाणीसाठा महापालिकेसाठी तारणहार ठरेल, असे चित्र अाहे.