आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी रुग्णालयांतील खाटांवरही आरक्षण, वैद्यकीय सेवेसाठी 1250 कर्मचारी प्रतिनियुक्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सरकारी-निमसरकारी रुग्णालयांतील २७०० खाटा अारक्षित करण्यात अाल्या असून, गरज पडल्यास खासगी रुग्णालयांमधील खाटाही अारक्षित करून ताब्यात घेतल्या जाणार अाहेत. यासह साडेबाराशे अधिकारी-कर्मचारी प्रतिनियुक्तीवर घेणार असून, तपाेवन, घाट परिसरात तात्पुरते रुग्णालय, ३३ अाराेग्य उपकेंद्रे २५ फिरत्या दवाखान्यांवर अाराेग्य व्यवस्थेचा भार असणार अाहे.
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अाराेग्य वैद्यकीय व्यवस्थेकडून िवशेष नियाेजन करण्यात अाले अाहे. शहरात भाविकांना येण्यासाठी सात वाहनतळे असून, येथून भाविक सरकारी वाहनांमधून गंगाघाटावर येणार अाहेत. या दरम्यान भाविकांना वैद्यकीय सेवेची गरज भासल्यास प्रत्येक वाहनतळावर एक प्राथमिक अाराेग्य उपकेंद्र असेल. त्यानंतर रामकुंडावरही एक अाराेग्य उपकेंद्र असेल. त्याबराेबरच तपाेवनात तीन रुग्णालय, १० उपकेंद्र, रामकुंडावर चार रुग्णालये अाठ उपकेंद्र उभारली जाणार अाहेत.
साधुग्राममध्येदेखील १०० खाटांचे रुग्णालय उभारले जाणार अाहे. याव्यतिरिक्त महापालिकेच्या सहाही विभागीय रुग्णालयांत २५० अतिरिक्त खाटा रुग्णांसाठी ठेवल्या जाणार अाहेत. याबराेबरच अाडगाव मेडिकल काॅलेजमधील एक हजार खाटा, संदर्भ सेवा रुग्णालय २०० खाटा, तर सिव्हिल हाॅस्पिटलमधील ५५० खाटांसह वाढीव २५०, अशा जवळपास २७०० खाटा रुग्णांसाठी उपलब्ध हाेणार अाहेत.
असा असेल मेडिकल स्टाफ अन‌् नियंत्रण कक्ष
याकाळात सुरळीत वैद्यकीय व्यवस्थेसाठी सहा मुख्य वैद्यकीय अधिकारी, १२१ डाॅक्टर्स, १५३ परिचारिका, ११३ अाैषधनिर्माता ३३० अन्य कर्मचाऱ्यांची गरज भासणार अाहे. यासह १४ नवीन रुग्णवाहिका लसीकरण व्हॅनही ठेवली जाणार अाहे. सेवाभावी संस्थांच्या रुग्णवाहिकाही तात्पुरत्या घेतल्या जातील. राजीव गांधी भवन येथे मुख्य िनयंत्रण कक्ष ठेवला जाणार असून, शहरातील सरकारी प्रमुख माेठ्या रुग्णालयांत तीन शिफ्टमध्ये विशेष वैद्यकीय पथक ठेवले जाणार आहे.