आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Plastic Surgeon Dr. Sanjay Parashar, Latest News In Divya Marathi

सौंदर्यप्राप्तीतून वाढतो आपला आत्मविश्वास- डॉ. संजय पाराशर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सौंदर्य वाढविण्यासाठी सर्जरीचा वापर उच्च वर्गाकडून होत असला, तरी सर्व सामान्य माणसालाही सुंदर दिसण्याचा हक्क आहे आणि तो विद्रुपीकरणावर सर्जरीतून सहज मात करू शकतो. सुडौल शरीरयष्टीतून येणार्‍या सौंदर्य प्राप्तीतून आत्मविश्वास वाढतो, असे प्रतिपादन दुबई येथील प्लास्टिक सर्जन डॉ. संजय पाराशर यांनी केले.
पाथर्डी फाटा येथील हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये इंडियन असोसिएशन ऑफ एस्थेटिक प्लास्टिक सर्जन्स संघटनेतर्फे प्लास्टिक सर्जरी तज्ज्ञांची तीनदिवसीय राष्ट्रीय परिषद सुरू आहे. परिषदेच्या दुसर्‍या दिवशी आयोजित चर्चासत्राप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. पाराशर बोलत होते. परिषदेत अमेरिकेचे डॉ. कुलवंत भांगू, र्जमनीचे डॉ. थॉमस गोहला, स्पेनचे रॅमन लुल, सिंगापूरचे सतीश तोटे, टाटा हॉस्पिटलच्या प्लास्टिक सर्जरी विभागप्रमुख डॉ. प्रभा यादव या प्रमुख मान्यवरांसह डॉ. सतीश अरोलकर, नीता पटेल, डॉ. राजेंद्र नेहते आदी मान्यवर उपस्थित होते. परिषदेचे उद्घाटन आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांच्या हस्ते झाले. वैद्यकीय क्षेत्रात प्लास्टिक सर्जरीचे महत्त्व वाढत असून, सर्जरी करणार्‍यांचे प्रमाणही वाढले आहे. विद्यापीठातर्फे फेलोशिप कोर्स सुरू करण्याचा विचार त्यांनी व्यक्त केला. दुसर्‍या दिवशी आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांनी सहभागी होत मार्गदर्शन केले. जगभरात सर्जरीविषयी होत असलेल्या बदलांची माहितीही डॉ. पाराशर यांनी दिली.
देशभरातील 150 सर्जन्सचा सहभाग
प्लास्टिक सर्जन परिषदेत देशभरातील 150 नामवंत सर्जन्सनी सहभाग घेतला. तसेच, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्जन्सही सहभागी झाले. सर्जरींचे महत्त्व वाढत असल्याने बदलत्या शस्त्रक्रियांची माहिती व्हावी, या उद्देशाने तज्ज्ञांनी विविध विषयांवरील चर्चासत्रांत मार्गदर्शन केले.