आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थोडी माती, थोडा बहर, ‘फार’मर; अंगणनाट्याद्वारे सरकारी धाेरणावर टीकास्त्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ‘जय जवान, जय किसान’ असा नारा दिला जात असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांचा जय आतापर्यंत कधीच झाला नाही. कधी निसर्गाचा प्रकोप तर कधी सरकारी व्यवस्थेच्या निगरगट्टपणामुळे शेतकऱ्यांच्या पाचवीला नेहमीच पराजय राहिला आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा, शेतकरी आत्महत्या, शेतकऱ्यांचा संप...अशा विविध विषयांवर दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये ‘कवी कट्टा’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘अंगणनाट्य’ या नाटिकेतून प्रकाशझोत टाकण्यात आला. ‘थोडी माती, थोडा बहर, फारमर’ या विषयावरील या नाटिकेतून सरकारी धोरणांवरही टीकास्त्र सोडण्यात अाले.
 
शेतीमालाला अजूनही हमीभाव मिळत नाही. सरकारदरबारी शेतीमालास हमीभाव देण्यात आला असला प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती त्यापेक्षा कमीच भावात शेतीमालाची विक्री करावी लागतेय. शेतीच्या उत्पादनाचा खर्च वाढत असून उत्पन्न मात्र त्या तुलनेत वाढत नाही. सरकारी धोरणांमुळेही शेतकऱ्यांची स्थिती सुधारू शकलेली नाही. शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्येच्या गर्तेत अडकला अाहे. शेतकऱ्यांचे हे वास्तव चित्र ‘थोडी माती, थोडी बहर, फारमर’ या अंगणनाटिकेतून परखडपणे मांडल्याने प्रेक्षकांची या नाटिकेला दाद मिळाली.

पुढील स्‍लाइडवर...उपस्थितांना अश्रू अनावर..
 
बातम्या आणखी आहेत...