आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ploitical News In Marathi, Shivsena Manse Together BJP Alone, Divya Marathi

शिवसेना-मनसे एकत्र, भाजप मात्र एकाकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरावर भाजप व मनसेच्या वाढत्या भेटीगाठींमुळे शिवसेना-भाजपमधील अभेद्य युती तुटण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यातच आता जेलरोड विभागात शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन राजकीय निरीक्षकांनाच बुचकळ्यात टाकले.
शिवजयंतीच्या निमित्ताने शिवसेना-मनसेतर्फे छत्रपती चौकातील अश्वारूढ पुतळ्याजवळ उभारलेल्या व्यासपीठावरून शिवजयंती मंडळे व शिवप्रेमींचे स्वागत झाले. मात्र, या घडामोडीत भाजप एकाकी पडल्याचे दिसून आले. गेल्या काही वर्षांपासून जेलरोड विभागाची अतिसंवेदनशील म्हणून ओळख झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त ठेवला होता. मात्र, जेलरोड शिवसेना व मनसेने पारंपरिक पद्धतींना फाटा देऊन एकच व्यासपीठ उभारले. त्यावर दोन्ही समितींच्या पदाधिकार्‍यांनी गळ्यात गळा घालून शिवप्रेमींचे स्वागत करून राज्यातील नेत्यांना वेगळाच संदेश दिला. दोन्ही पक्षांमधील मनोमिलनाचे चित्र बघून शिवप्रेमींना आश्चर्य वाटत होते. दोन्ही समित्यांचे नगरसेवक अशोक सातभाई, दिनकर आढाव, बाळासाहेब शेलार, नरेंद्र आढाव, सुनंदा कुमावत, शिवा ताकाटे, बाळासाहेब गाडगीळ यांनी एकत्र येऊन शिवजयंती साजरी केली.