आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साधू-महंतांच्या आखाड्यांना साधुग्राममधील प्लॉटचे वाटप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सहादिवसांवर येऊन ठेपलेल्या कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये दाखल झालेल्या साधू-महंतांच्या आखाडे आणि खालशांना साधुग्राममधील जागा वाटपास सुरुवात झाली आहे. मंगळवारी (दि. ७) आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांच्या उपस्थितीत तीन आखाड्यांना जागा दिली गेली.

३२५ एकरावर साधुग्रामची उभारणी झाली असून, साधू-महंतांना तेथेच पर्णकुटी देण्यात अाल्या अाहेत. तेथे उपलब्ध केलेल्या प्लॉटवरून काही प्रमाणात साधू-महंतांनी नाराजीही व्यक्त केली होती. त्यामुळे ऐनवेळी सिंहस्थात नव्यानेच वाद उभे राहाण्याची शक्यताही वाढली होती. परंतु, आता त्यावर तोडगा निघाला असून, मंगळवारपासून त्यांच्या वाटपासही सुरुवात झाली आहे. महंत ग्यानदास महाराज यांच्या उपस्थितीत दिगंबर आखाडा, निर्वाणी आखाडा, निर्मोही आखाडा अशा तीन आखाड्यांना जागा वितरित झाली.

पालिका देणार सुविधा
आखाड्यांनावाटप करण्यात आलेल्या जागांवर आता मनपाकडून सर्व सोयी -सुविधा दिल्या जाणार आहे. शिवाय, आखाड्यांतील साधू-महंतांच्या मागणीनुसारही आवश्यक त्या सर्वच सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.

धार्मिक संस्थांना जागा
आखाडे,खालसे यांना जागा वाटप केल्यानंतर उरलेल्या जागा अर्थात प्लॉट हे धार्मिक संस्थांनाही दिले जाणार आहे. त्यांचीही हद्द निश्चिती मनपाकडून केली जाणार आहे.