आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरस्वती नदी नामशेष हाेण्याची भीती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर- शेकडाेवर्षांपासून प्रसिद्ध असलेल्या भैरवनाथ मंदिराच्या तळ्याची जमीन प्लाॅटसाठी उपयाेगात अाणण्याची तयारी सुरू झाल्याने मापारवाडी मळहद्दीतील शेतकरी संतप्त झाले अाहेत.
ढग्या डाेंगरातून उगम पावणाऱ्या सरस्वती नदीचे पाणी तळ्याच्या जागेत येऊन स्थिरावते तळे भरल्यानंतर सरस्वती नदीही वाहू लागते. मात्र, भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भैरवनाथांच्या तळ्याची जमीन अादिवासींमार्फत खरेदी करून या जागेवर कुंपण टाकण्याचे काम सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी साेमवारी या जागेवर जमा हाेऊन तीव्र विराेध दर्शविला. या प्रकरणी शासनाकडे तक्रार करण्याबराेबरच न्यायालयातही धाव घेण्यात येणार असून, इत:पर या जागेत कुंपण टाकण्याचे किंवा तळे बुजवण्याचे काम सुरू झाल्यास अांदाेलन करण्याचा इशारा अॅड. नामदेव हिरे, शिवाजी गाडे, एकनाथ काळे अादींनी दिला अाहे. या प्रकरणी शासनाने त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली अाहे.


अांदाेलन करू
शेकडाेशेतकऱ्यांचे जीवन तळ्यावर अवलंबून अाहे. अधिकाऱ्यांना हाताशी धरून राजकीय दडपण अाणून काेणी तसे करत असेल, तर त्याचा न्यायालयीन लढाई जनअांदाेलनाद्वारे हा प्रयत्न अाम्ही हाणून पाडू. अॅड.एन. एस. हिरे, शेतकरी नेते
तक्रार अाल्यास चाैकशी करणार
याप्रकरणी शेतकऱ्यांची तक्रार अाल्यावर कागदपत्रे तपासून चाैकशी करण्यात येईल. मनाेजखैरनार,तहसीलदार, सिन्नर

भैरवनाथांच्या तळ्यात साचणाऱ्या पाण्यामुळे सरस्वती नदी प्रवाहित हाेते. या पाण्यामुळे काळे मळा, मापारवाडी मळहद्दीतील सुमारे ५०० शेतकऱ्यांच्या हजार हेक्टरहून अधिक जमिनीच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध हाेते. मात्र तळे बुजविले गेल्यास सरस्वती नदीचा उगमच नामशेष हाेईल. हा परिसर माळेगाव एमअायडीसीच्या लगत असल्याने परिसरावर जमीन विकासकांचा डाेळा असून तळे नदीचा उगम पाहता प्लाॅट पाडण्याचे काम सुरू असल्याचा अाराेप शेतकऱ्यांनी केला एकीकडे शासन जलयुक्त शिवार अभियानासाठी काेट्यवधी खर्च करत असतांना नैसर्गिक तळे कसे काय बुजविले जाऊ शकते असा सवालही शेतकऱ्यांनी केला.

परिसरातील पवार, जाधव, गायकवाड, गाेधडे अादी अादिवासींच्या नावावर गट नं. ६० ६१ मधील जमीन अाहे. पैकी गट नं. ६१ मध्ये भैरवनाथांचे तळे अाहे. या तळ्यात किंवा त्याच्या ज्या भागात पाणी नसते, तेव्हा तेथील गाळपेरा जमीन कसण्यासाठी म्हणून अादिवासींकडून वापरली जाते. मात्र, सन २०११ मध्ये ही जमीन नरहरी सीताराम झिरवाळ यांनी अादिवासींकडून ख‌्रेदी केली. तेथे गेल्या तीन दिवसांपासून कुंपण टाकण्याचे काम सुरू झाल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी त्यास विराेध केला. साेमवारी सकाळी जमलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी कुंपणाचे काही खांब उखडून टाकले. देवाचे तळे सरस्वतीचा उगम नामशेष करण्याचा डाव हाणून पाडू असे अॅड. हिरे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले.