आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक- प्रसिद्ध हिंदी कवी, लेखक पद्मभूषण हरिवंशराय श्रीवास्तव बच्चन यांच्या जन्मतारखेबाबत चुकीचा उल्लेख इयत्ता नववीच्या हिंदी विषयात करण्यात आल्याचे उघड झाले. राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ही गंभीर चूक झाली आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नववीच्या संपूर्ण हिंदी विषयाच्या पुस्तकाची पहिली आवृत्ती मागील वर्षी प्रसिद्ध केली आहे.या पुस्तकात हरिवंशराय बच्चन यांची ‘आ रही रवि की सवारी’ ही कविता 64 क्रमांकाच्या पानावर प्रसिद्ध केली आहे. या कवितेच्या शीर्षकाखाली जन्म 1964 व मृत्यू 2003 अशी नोंद आहे. प्रत्यक्षात हरिवंशराय यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1907 रोजी इलाहाबाद जवळील प्रतापगड जिल्हयातील बाबु पट्टी या गावात झाला. तर मृत्यू 18 जानेवारी 2003 रोजी असे असताना 1964 मध्ये जन्म झाल्याचा शोध कुठून लावला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुन्हा छपाई व्हावी
जन्मतारखेची चूक लक्षात येण्यासारखी नाही. पुस्तक छपाईपूर्वी पू्रफरीडिंगकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ही चूक झाली असावी. दुरुस्तीनंतर पुस्तकाची पुन्हा छपाई व्हावी.’’
सुहास खरोटे, उपमुख्यध्यापक, पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल, नाशिक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.