आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Poet Kusumagraj Award Distribution On 28 July At Nashik

‘आणि बुद्ध पुन्हा एकदा हसला म्हणून’ प्रथम; ‘कुसुमाग्रज पुरस्कारां’चे 28 ला वितरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिक कवी संस्थेतर्फे कुसुमाग्रजांच्या नावाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत काव्यसंग्रहासाठी यवतमाळचे सिद्धार्थ भगत, तर काव्यलेखन स्पर्धेत कवी सलीम व विजय बागूल मानकरी ठरले. भगत यांच्या ‘आणि बुद्ध पुन्हा एकदा हसला म्हणून’ काव्यसंग्रहाला पुरस्कार मिळाला. पुरस्कारांचे वितरण 28 जुलै रोजी दुपारी 3 वाजता कुसुमाग्रज स्मारकात होईल. द्वितीय पुरस्कार कैलास पगारे (नाशिक), तर तृतीय क्रमांकाचा पुरस्कार चित्रसेन शबाब (गोवा) यांना मिळाला. उत्तेजनार्थ पुरस्कार रमेश चव्हाण (नवापूर), किशोर मुगल (चंद्रपूर), तर शारदा नवले (नवी मुंबई) यांना मिळाला.

छंदोबद्ध गटाचे मानकरी
काव्यलेखन स्पर्धेच्या छंदोबद्ध गटातून सिन्नरचे कवी शेख जावेद सलीम यांना ‘पाऊस होऊ’ या काव्यसंग्रहासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. द्वितीय क्रमांक गझलकार रावसाहेब कुवर (साक्री), तृतीय क्रमांक - कवयित्री प्राची जोशी-दिवेकर (पुणे), उत्तेजनार्थ पुरस्कार - शशिकला देशमाने (नाशिक) यांच्या ‘अवतार’, डॉ. अमेय गोडबोले (रत्नागिरी) यांच्या ‘चाहता मी वेगळा’, तर संजय कुळथे (रत्नागिरी) लिखित ‘पाळणाघरातलं बालपण’ या कवितेस मिळाला.