आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी उत्सव: उसळली विनाेदाची कारंजी अन‌् सभागृहात काेसळले हास्याचे धबधबे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘दिव्य मराठी’ उत्सवानिमित्त गंगापूरराेड येथील शंकराचार्य डाॅ. कुर्तकाेटी सभागृहात झालेल्या मंगळवारी झालेल्या हास्य कविसंमेलनात रसिकांकडून प्रत्येक कवितेला हास्य अाणि टाळ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत हाेता. काेपरखळ्यांची पखरण करीत कविता सजविणाऱ्या रामदास फुटाणे यांनी
जपूनवागावं.. जपून बाेलावं,
अन्यथा हिशेबाचा त्रास हाेताे
नकाे ती गळ्यात पडली की,
मफलराचा सुद्धा फास हाेताे’
हीकविता सादर करून पहिल्याच चेंडूत षटकार मारला. कवितेत लपलेला ‘मफलराचा फास’ लगेचच उमजल्याने उपस्थितांनी त्यास तितक्याच उत्स्फूर्तपणे ‘वाहवा’ दिली.
राजकीय भाष्याची मालिका पुढे चालू ठेवत रामदास फुटाणे पुढे म्हणाले की,
तपकिरी ‘फुल’च्या कंबरेवर हात टाकीत
खाकी‘हाफ’ म्हणाली
सैलपणाचं दु:ख टळत नव्हतं,
उजवीकडून काेण अाला,
डावीकडून काेण उतरला
काळ्या टाेपीलाही कळत नव्हतं...
राष्ट्रीयस्वयंसेवक संघाच्या गणवेश बदलावर अाधारित असलेल्या या कवितेला कुर्तकाेटी सभागृहात हास्याच्या स्फाेटानेच प्रतिसाद मिळाला नसेल तर नवलच. फुटाणे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी थेट विजय मल्ल्यांवरही बाण साेडला.
जिथेसुंदरीच्या असे मद्य हाती
जिथे बँक प्रभू हे ‘विजय’ गीत गाती
जिथे बुडतानाही गाताे तराने
असा किंगफिशर पुन्हा हाेणे
रामदासफुटाणेंच्या राजकीय भाष्याला त्याच ताकदीची साथ देत कवी सुरेश शिंदे यांनी हास्यमालिका पुढे चालू ठेवली.
अाताकमळ तळ्यात
पाण्यावर सत्ता अाहे
धनुष्य कधीच निघून गेला
त्याचा बाणांनाही पत्ता अाहे.
घड्याळ माेठे गुढ अाहे
हातात असून कळत नाही
साेडून ठेवील म्हटलं तर
मरणही टळत नाही.
याकवितेला डाेक्यावर घेतानाच रसिकांनी वन्समाेअरचाही अाग्रह धरला. या अाग्रहाला मान देत पुन्हा सादर केलेल्या या कवितेला प्रतिसाद मिळाला. ‘तळे अाणि पाणी’ ही कविताही लक्षवेधी ठरली.
पाऊसमाळावर पडाे की मळ्यात
पाणी त्यांच्याच तळ्यात जाते
काेणत्याही वाऱ्यावर उफनलं
रास त्यांच्याच खळ्यात जाते..
अशाया चिमटे घेणाऱ्या कविता सुरू असताना प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांनी ‘माहाैल’ बदलत त्यांच्या विशेष शैलीतील कविता सादर केल्यात.
छातीतफुले फुलण्याची,
वाऱ्यावर मन झुलण्याची
ती वेळ निराळी हाेती,
ही वेळ निराळी अाहे
याकवितेने उपस्थितांना एक वेगळ्याच दुनियेत नेले. अशा या कवितेच्या नगरीत अादिवासी पाड्यावरून अालेला तुकाराम धांडे नावाचा कवी उभा राहताे अाणि त्याच्या पहिल्याच कवितेतून ताे रसिकांकडून मनसाेक्त वाहवा मिळवताे.
साहेबअावं, इठ कह्याचा
देस धरम अन् जात पात
इठ मरणासी अाट्या पाट्या खेळत
पाणी गवसीत फिरणं अन्
पाण्यावाचून मरणं, हीच इठली रितभात...
याकवितेने उपस्थितांना सुन्न केले. त्याच धाटणीची वाटणी ही कविताही विशेष दाद घेऊन गेली.
‘जुनंपाचखणी घर तुला
नवं तीनखणी घर मला
तुझी मुलं लहान अाहेत
अाई तुझ्याकडे राहील
माझं घर अाडबाजूला
मला कधी कधी रात्रपाळी असते
म्हातारा माझ्याकडे राहील.
ही अाई-वडिलांची वाटणी नाही बरं!
दाेनही घरं त्यांचीच अाहेत. पण
हे अापलं, अातल्यांच्या साेयीसाठी. असाे!
भाऊबंदकीचीवाटणी अापल्या ग्राम्य शैलीत मांडताना धांडे यांनी उपस्थितांच्या डाेळ्यात अासवे अाणलीत. नाशिकच्या मातीतील प्रा. प्रशांत माेरे यांनीही अापल्या गेय कवितांची बरसात करीत नात्यांमधील हळव्या गाठी उलगडल्या.
राजा रजवाड्याची तू
माझं फकीर घराणं
कसं अाेठावर सई माझं
गाेंदलं गं गाणं
प्रेयसीच्या प्रभावाची ही अनाेखी कविता वाहवा घेऊन गेली.
तुझाहात परीस, माझा लाेखंडी गं झुला
हात परीस लागता, झुला साेन्याचा झाला
रसिकांच्याफर्माईशीवरुन सादर झालेली ही कविताही संपूर्ण संमेलनात वैशिष्ट्यपूर्ण ठरली. रामदास फुटाणे यांनी अापल्या खुमासदार शैलीत काव्य संमेलनाचे सूत्रसंचालन केले. पाहुण्यांचे स्वागत जनरल मॅनेजर मदनसिंह परदेशी अाणि डेप्युटी एडिटर अभिजित कुलकर्णी यांनी केले. संमेलनाचा अास्वाद घेण्यासाठी उपस्थितांच्या गर्दीने सभागृह तुडूंब भरले हाेते.
म्युझिक ट्रॅकवर गायली कविता
कवितासादर करणं अनेकांना माहिती अाहे. ती संगीताशिवाय गायलीही जाते, पण या कविसंमेलनात कविता थेट म्युझिक ट्रॅकवरच गायली गेली अाणि त्याला रसिकांनी भरभरून दाद दिली. कवी अरुण म्हात्रे यांनी ‘उंच माझा झाेका’ या मालिकेचे शीर्षकगीत लिहिलेले अाहे. हे गीत त्यांनी म्युझिक ट्रॅकवर सादर केले. मालिकेत हे गीत फक्त एकाच कडव्याचे अाहे. म्हात्रेंनी या गीताची तिन्ही कडवी सादर केली. रसिकांनी टाळ्यांच्या ठेक्याने या गीताला दाद दिली.
तुडुंब गर्दीने अाेसंडून वाहिले सभागृह
कवींपासूनलाेकं दूर पळतात असा समज या कार्यक्रमाने खाेटा ठरविला. फुटाणेंचे फटके, म्हात्रेंचे अाणि प्रशांतचे सूर, धांडेंचे कवितेतून मांडलेले वास्तव अाणि सुरेश शिंदेंनी घेतलेले चिमटे हे एेकण्यासाठी रसिकांनी शंकराचार्य न्यासाचे सभागृह तुडुंब भरले हाेते. अनेक रसिकांनी उभे राहून कवितांचा अानंद घेतला. विशेष म्हणजे या संमेलनाला ज्येष्ठांपासून तरुणांनी गर्दी केली हाेती.
बातम्या आणखी आहेत...