आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिस दलाचे प्रशिक्षण कधीच संपत नाही : सतीश माथूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पोलिस दलात सेवा करत असताना रोज प्रशिक्षण करावे लागते. भविष्यात पोेलिस सेवा करताना सर्वस्व अर्पण करून नागरिकांना मदत करावी. महाराष्ट्र पोलिस अकादमीला स्वायत्त दर्जा मिळाल्याने प्रगतीपथावर आहे. राष्ट्रीय अकादमीप्रमाणे प्रशिक्षण केंद्राला दर्जा मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी केले.

प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक सत्र क्रमांक ११४ व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ बुधवारी (दि. ५) एमपीएमध्ये झाला. महासंचालक सतीश माथूर यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमास अपर पोलिस महासंचालक एस. जगन्नाथन, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल, विशेष पोलिस महानिरीक्षक व्ही. के. चौबे, संचालक नवल बजाज यांच्यासह पोलिस अधिकारी उपस्थित होते. माथूर म्हणाले की, पोलिस खात्यात सेवा करताना तक्रारदार नागरिकांना आपल्यामध्ये बघावे. महाराष्ट्र पोलिस अकादमीला शासनाने स्वायत्तत्ता बहाल केली अाहे. पोलिस उपनिरीक्षक, उपअधीक्षक यांना प्रशिक्षण देऊन प्रत्यक्ष कर्तव्य बजावण्यासाठी प्रशिक्षण केंद्र प्रगतीपथावर आहे. कर्तव्य बजावताना आव्हानात्मक परिस्थितीशी सामना करून समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वस्व अर्पण करावे. नागरिकांना मदत करावी. एनडीए समान पोलिस अकादमीला दर्जा मिळणार आहे. पोलिसांचे प्रशिक्षण कधीच संपत नाही. पोलिस दलाला विविध साधन सामग्री मिळणार आहे. त्याचा योग्य वापर करून गुन्ह्यांची सोडवणूक करून नागरिकांना मदत करण्याचे आवाहन उपनिरीक्षकांना केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ६ प्लाटून्सचे १८० अधिकारी परेडमध्ये सहभागी झाले. कमांडर तुषार शाहू, सेकंड कमांडर जयेश कुलकर्णी यांनी शिस्तबद्ध संचलन करत उपस्थितांची दाद मिळवली. कल्पेशकुमार चव्हाण, छाया पाटील यांना मानाची तलवार प्रदान करण्यात आली. महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये ११४ व्या तुकडीतील २३७ प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक पोलिस सेवेत दाखल झाले. यामध्ये १८३ पुरुष, ५४ महिला उपनिरीक्षकांचा समावेश आहे. राज्यातील विविध पोलिस ठाण्यात या उपनिरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली.

या प्रशिक्षणार्थींचा गौरव
डॉ. अांबेडकर कप-राहुल शिंदे, गुन्हे आणि गुन्हेगारी विषय-अमोल चौधरी, अत्याधुनिक तंत्रज्ञान-संदीप काळे, सावित्रीबाई फुले कप-छाया पाटील, सिल्व्हर बटन-राहुल शिंदे, अहिल्याबाई होळकर कप-छाया पाटील, शूटिंग-अनिल वाघमोडे, उत्कृष्ट पीटी, बेस्ट ऑफ ड्रील-रवीकिरण खंडारे, उत्कृष्ट खेळ- संतोष राठोड, प्रशिक्षण वर्तणूक-आकाश पवार, संचालकांचे गुणवत्ता-अविनाश नळेगावकर पट्टेवाला झाला उपनिरीक्षक : कल्पेशकुमार चव्हाण लोकसेवा अायाेगाच्या परीक्षेची पाच वर्षांपासून तयारी करत होता. सुरुवातीला अपयश आल्याने डी.एड. पूर्ण केले. काही दिवस खासगी संस्थेत शिक्षकाची नोकरी केली. न्यायालयात पट्टेवाला म्हणून नियुक्ती मिळाली. मात्र, उपनिरीक्षक पदाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी परीक्षा देणे सुरूच ठेवले.

अखेर पाचव्या प्रयत्नात यश आले. शिरसाग (ता. चाळीसगाव) येथे वडिलोपार्जित शेती आहे. एकत्रित कुटंुब आहे. मात्र, मानाची तलवार मिळवणारा पहिलाच असल्याचा अभिमान कल्पेशकुमारला आहे.

जळगाव जिल्ह्यातील मजुराची मुलगी बनली पोलिस अधिकारी
तीन बहिणी व एक भाऊ असलेली छाया पाटील मुळची धुळेपाटणी (जि. जळगाव) येथील रहिवासी अाहे. तिचे वडील मजुरी करतात. डी.एड. नंतर बी.ए. पूर्ण केले. शिक्षकाची नोकरी मिळत नाही म्हणून लोकसेवा, राज्यसेवेच्या परीक्षा दिल्या. सुरुवातीपासून पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न होते. काही दिवसापूर्वी वडिलांना अर्धांगवायूचा झटका अाला. तरी देखील न डगमगता पहिल्यात प्रयत्नात उपनिरीक्षक पदाची परीक्षा उतीर्ण झाली. महिलांवर होणारे अत्याचार, काैटुंबिक हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी खात्यात राहून महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे छाया पाटील हिने सांगितले.
बातम्या आणखी आहेत...