आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांकडून शहरातील भाईंची जनता दरबारात पेशी, गुंडांच्या वरातीने सिडकाेवासीयांकडून स्वागत पान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सर्व सामान्य नाशिककरासह व्यापाऱ्यांना धमकी देऊन त्यांच्याकडून खंडणी वसूल करणाऱ्या शहरातील टिप्पर चांगले गँगच्या गुंडांची त्यांच्याच भागात पाेलिसांनी बुधवारी वरात काढून त्यांना कायदा काय अाहे हे दाखवून दिले. पाेलिसांच्या या धडाकेबाज कारवाईबाबत नागरिक व्यापाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त हाेत अाहे.
टिप्पर चांगले गँगच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवायांमुळे शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण अाहे. दिवसाढवळ्या खून, लुटमार, दराेडे यांसारख्या घटनांनी शहरवासीय त्रस्त झाले अाहेेत. पाेलिसांना अाव्हान देणाऱ्या या गँगस्टर्सची पाळेमुळे उखडण्यासाठी पाेलिस कमालीचे सतर्क झाले अाहेत. पाेलिस अायुक्त एस. जगन्नाथन यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ एकचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील परिमंडळ दाेनचे उपायुक्त श्रीकांत धिवरे, तसेच सहायक अायुक्त डाॅ. राजू भुजबळ, अतुल झेंडे यांनी गुंडांच्या मुसक्या अावळण्यासाठी धडाकेबाज माेहीम हाती घेतली अाहे. पाेलिस अायुक्तालयात दरराेज काेम्बिंग, वाहन तपासणी करून त्यांनी गुन्हेगारांना सळाे की पळाे करून साेडले अाहे. असे असले तरी गुन्हेगारी घटना घडतच असल्याने पाेलिस चक्रावून गेले हाेते. मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या भाईंच्या इशाऱ्यावर या कारवाया हाेत असल्याचे लक्षात अाल्यानंतर पाेलिसांनी तेथेही धडक तपासणी माेहीम राबविली. गुन्हेगारांच्या बारीक हालचालींवर लक्ष केंद्रित केल्याने अाता गुन्हेगार पाेलिसांच्या जाळ्यात अडकू लागले अाहेेत.

दहशत संपविणार
^आम्ही या गुंडांची दहशत संपविण्यासाठी गुन्हेगारी वृत्तीचा नाश करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. यापुढे गुन्हे करण्याची या गुंडांची हिंमतच हाेणार नाही. -श्रीकांत धिवरे, पोलिस उपायुक्त.

पाेलिसांनी बुधवारी चांगले गँगच्या गणेश चांगले त्याचा साथीदार देवीदास बागुल या दाेघा गुंडांना शहरातील एका हाॅटेलजवळ सापळा रचून अटक केली. या गुंडांची पाेलिसांनी अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे गावठी कट्टा, चाॅपर, मिरचीची पुडी दाेरी असे साहित्य मिळाले हाेते. परिमंडळ एकचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी या दाेन्ही भाईंची त्यांची दहशत असलेल्या अशाेकस्तंभ रविवार कारंजा परिसरातून धिंड काढली तर परिमंडळ दाेनचे उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी टिप्पर गँगची दहशत असलेल्या सिडकाेत या गँगच्या गुंडांची धिंड काढली. तसेच पाेलिसांनी मुंबई नाका परिसरातील एका हाॅटेलमध्ये एकाकडून कट्टा जप्त केला.
बातम्या आणखी आहेत...