आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेशिस्तपणे वाहने उभी करणाऱ्यांना दणका, ४० कारचालकांवर गुन्हे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- उंटवाडी येथील सिटी सेंटर माॅलसमोर प्रजासत्ताकदिनी मंगळवारी (दि. २७) बेशिस्तपणे रस्त्यात वाहने उभी करून खरेदीसाठी गेलेल्या तब्बल ४० कारचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करता गंगापूर पोलिसांनी थेट गुन्हे दाखल करीत न्यायालयात खटले पाठविले आहेत. या कारवाईने वाहनचालकांचे धाबे दणाणले असून, यापुढे माॅलसमोरील रस्ते अथवा रहिवासी भागात वाहने उभी करणाऱ्यांविरोधात अशाच प्रकारे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

सिटी सेंटर माॅलच्या समोरील एबीबी सर्कल ते उंटवाडी, संभाजी चाैकपर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा वाहनधारक वाहने उभी करून खरेदीसाठी मॉलमध्ये जातात. गेल्या सोमवारी मंगळवारी मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी झाली होती. बहुतांश वाहनधारकांनी रस्त्यावरच परिसरातील उषाकिरण सोसायटी, लवाटेनगर, उंटवाडी भागात कार उभ्या केल्या हा ेत्या. त्यामुळे दाेन्ही बाजूची वाहतूक ठप्प होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. या ठिकाणी नियमितपणे वाहनधारक वाहने उभी करीत असल्याच्या रहिवाशांच्या तक्रारीची दखल घेत गंगापूर पोलिस वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली. यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसह निरीक्षक शंकरराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ४० कारचालकांवर त्यांचे वाहन क्रमांक घेऊन मोटार वाहन अधनियम भा.दं.वि. कलम २८३ अन्वये थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

न्यायालयात खटले दाखल
याप्रकरणात पोलिसांकडून कारच्या क्रमांकांवरून गुन्हे दाखल करीत वाहनधारकांचे नाव, पत्ते ‘आरटीआे’कडून शा ेधण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित कारचालकांशी संपर्क साधून त्यास कायदेशीर अटक करण्यात येत आहे. त्यांना न्यायालयात हजर करून त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई जामीन देण्याची प्रक्रिया करावी लागत आहे. वाहनधारकांकडून जागेवरच दंड वसूल करता त्यांच्याविरुद्ध थेट खटले दाखल केल्याने त्यांना न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागणार आहेत.
नियमित करणार कारवाई
-माॅल्समध्येपुरेसे वाहनतळ असून, वाहनचालकांनी त्याच ठिकाणी वाहने उभी केली पाहिजेत. रस्त्यावर अथवा रहिवासी भागात वाहने उभी केल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. या गुन्ह्यात संशयित वाहनचालकांना न्यायालयात हजर करून तेथेच जामीन घ्यावा लागतो. कारचालकांना दंडाची शिक्षा होऊ शकते. ही कारवाई नियमितपणे राबिवण्यात येणार आहे. शंकरकाळे, वरिष्ठ निरीक्षक, गंगापूर पोलिस ठाणे