आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात रात्री 33 मद्यपी टवाळखोरांवर कारवाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी मद्यपी व टवाळखोरांविरुध्द शुक्रवारी पुन्हा मोहीम सुरू केली आहे. पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत 12 मद्यपी, तर गंगापूर ठाण्याच्या हद्दीत 21 टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली आहे.
शहरात गुन्हेगारी थांबविण्यासाठी पोलिसांनी वेळोवेळी कोम्बिंग ऑपरेशन, वाहनांची तपासणी, मद्यपींवर कारवाई अशा विविध मोहीम पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी रात्री पुन्हा मद्यपी व टवाळखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. पंचवटी भागात पंचवटी क्राइम ब्रॅचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली 12 मद्यपींवर कारवाई केली. त्याचप्रमाणे प्रत्येक पोलिस ठाणे हद्दीत टवाळखोर व मद्यपी यांच्यावर कारवाई केल्याने मद्यपींनी व टवाळखोरांनी धसका घेतला आहे.
प्रत्येक सोसायटीला पोलिस देणार भेट - रविवारपासून पंचवटी भागातील प्रत्येक सोसायटीत पंचवटी ठाण्यातील पोलिस तेथील अध्यक्षांची भेट घेऊन रहिवाशांची पत्त्यासह संपूर्ण माहिती, तसेच सुरक्षेसाठी सहभाग या विषयावर मार्गदर्शन करून माहिती घेणार असल्याचे वरिष्ठ निरीक्षक बाजीराव भोसले यांनी सांगितले.