आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाचारसंहिता कालावधीत पोलिसांनी बजावले 1,179 गुन्हेगारांना वॉरंट, पोलिसांची धडक कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत आणि मतदानाच्या पुर्वसंध्येपर्यंत सुरू असलेल्या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल १,१७९ गुन्हेगारांविरुद्ध वॉरंट काढले असून, १,०५१ गुन्हेगारांना प्रत्यक्ष वॉरंट बाजवण्यात आले आहे.
 
पोलिसांच्या या धडक कारवाईचा धसका घेत बहुतांश गुन्हेगारांनी शहरातून पलायन केले आहे. यात काही नामचिन गुन्हेगारांचाही समावेश आहे. निवडणूक आचारसंहिता काळात पोलिसांकडून प्रथमच अशी विक्रमी कारवाई झाली अाहे. 
 
महानगरपालिका निवडणुकीच्या प्रारंभीच खूनाची घटना घडल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी कठोर भुमिका घेत बंदोबस्त नियोजनाची सर्व सूत्रे हाती घेत गुन्हेगारांविरोधात धडक कारवाईचे आदेश दिले. विविध कार्यक्रमांच्या नियोजनामध्ये व्यस्त ‘खाकी’ला हाती दंडुका घेत धडक कारवाईचे आदेश दिल्याने पोलिसांमध्ये उर्जा निर्माण झाली. 
 
या आदेशाने प्रभावीत होत सर्व अधिकाऱ्यांनी गुन्हेगारांची ‘ब्लु प्रिंट’ तयार केली. कोम्बिंग, ऑलआऊट, गुन्हेगार चेकिंग, सराईत गुन्हेगारांना पोलिस ठाण्यात हजेरी बंधनकारक केली. या कारवाईने आचारसंहिता काळात शहरात किरकोळ घटना वगळता प्रचाराची शांततेत सांगता झाली. यावर समाधान मानता अधिकाऱ्यांना मतदानाच्या पुर्वसंध्येपर्यंत धडक कारवाई सुरुच ठेवत ११७९ गुन्हेगारांना वॉरंट बजावले.
 
यापैकी १०५१ गुन्हेगारांना प्रत्यक्ष वॉरंट बाजवण्यात आले. ही कारवाई सुरू राहणार आहे. उपायुक्त श्रीकांत धिवरे, लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ.राजू भुजबळ, विजयकुमार चव्हाण, अतुल झेंडे, मोहन ठाकुर, जयंत बजबळे, यांच्यासह वरिष्ठ निरिक्षक मधुकर कड, दिनेश बर्डेकर, सोमनाथ तांबे, डॉ. सीताराम कोल्हे, पंढरीनाथ ढोकणे, महेश देविकर, सुभाष डवले, या अधिकाऱ्यांकडून मतदानाच्या दिवसांपर्यंन्त ही धडक कारवाई करत होते. 
 
अशी झाली कारवाई 
परिमंडळनाशिकरोड- वॉरंट प्राप्त- १२८, बजावणी- १०४, प्रलंबित-२४, उपनगर- १३६- ११८, १८, देवळाली कॅम्प- २९- २२-०७, इंदिरानगर- ५२- ४८-०४, अंबड- २५०- २४२- 8, सातपुर- १७- १३- 4
परिमंडळ-१ भद्रकाली- वॉरंट प्राप्त १४२- बजावणी-१४१ प्रलंबित -१, सरकारवाडा- ५९-३९-२०, गंगापुर- ७४- ६८-०६, मुंबईनाका- ६४-५९-०५, पंचवटी- १४८- १३४-१४, आडगाव- ६३-४७-१६ म्हसरुळ- १७-१७-० 
 
बोगस मतदानावर राहणार पोलिसांची करडी नजर 
महापालिकानिवडणुकीत यंदा बोगस मतदान होण्याची शक्यता नाकारता येणार नसून काही बोगस मतदार करणाऱ्या टोळीकडून कृत्रिम बोट तयार करुन मतदानाच्या दिवशी शाई लावण्यासाठी या बोटाचा वापर केला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
त्यामुळे अशा बोगस मतदारांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. उमेदवारांकडून पैशांच्या वाटपापासून थेट बोगस मतदानापर्यंतचे शस्त्र वापरले जाणार असल्याची चर्चा आहे. प्रभाग मोठा असल्याने यंदा बोगस मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बोगस मतदानासाठी नवीन फंडेही पुढे आले असून काहींनी तर थेट कृत्रिम बोट तयार केले आहेत. शाई दिसून येवू नये म्हणून मतदानाच्या दिवशी या बोटाचा वापर केला जाणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...