आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा धडाका तिसऱ्या दिवशीही सुरूच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरातील वाढलेल्या गुन्हेगारीपाठोपाठ बेशिस्त वाहतुकीनेही डोके वर काढले आहे. दोन दिवसांपूर्वी राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण दीिक्षत यांना शहराच्या दौऱ्यात बेशिस्त वाहतुकीचे दर्शन झाल्याने पोलिस आयुक्तांनी गुरुवार सकाळी सर्व पोलिस ठाण्यांना बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार गेल्या तीन दिवसांत तब्बल दीड हजारांवर बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई यापुढेही सुरुच राहणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.

शहरात वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा गंभीर बनला असतानाच, बेशिस्त वाहतुकीनेही डोके वर काढले आहे. वाहतूक शाखेकडून रिक्षाचालकांवर नियमित कारवाई केली जात असली तरीही पोलिस ठाण्यांतर्गत सुरू केलेल्या नाकेबंदीदरम्यान अशा रिक्षा सलामत राहत असल्याने, बेशिस्ती अधिकच वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार वाहतूक शाखेसह १३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई सुरू आहे. कागदपत्र नसणे, गणवेश नसणे, बॅज जवळ बाळगणे, फ्रंटसीट बसवणे इत्यादी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू आहे.

अशी झाली कारवाई
उपआयुक्त, सहायक आयुक्त, १८ निरीक्षक, ४३ उपनिरीक्षक, २३४ कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून १६४१ रिक्षांवर कारवाई केली. लाख ९२ हजार ८५५ रुपये दंड वसूल करण्यात आला.

कारवाई सुरूच राहणार
शहरातील बिघडलेली वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी रिक्षांसह सर्वच वाहनांवर कारवाई सुरू आहे. रस्त्यांवर व्यवसाय थाटणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. वाहतूक नियमांचे पालन करावे कारवाई टाळावी.- देवीदास पाटील, सहायकआयुक्त वाहतूक शाखा
बातम्या आणखी आहेत...