आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Administration Latest News In Divya Marathi

पोलिसांची ‘हद्द’, जखमीचा तडफडत मृत्यू, सकाळी सहाला कळवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- धावत्यारेल्वेतून ‘तो’ अचानक पडला... खरं तर, अशा स्थितीत प्राण वाचणे मुश्लीलच, पण तो वाचला, एवढंच नव्हे तर तब्बल पाच तास जिवंतही राहिला, जायबंदी अवस्थेत डोळ्यांत प्राण आणून उपचाराच्या मदतीची प्रतीक्षा करीत... पण शेवटपर्यंत ती मिळालीच नाही अन् काही वेळापूर्वी मृत्यूला हुलकावणी दिल्याने नशीबवान ठरलेला ‘तो' तितकाच दुर्दैवीही ठरला. याला कारणीभूत ठरला दोन पोलिस ठाण्यांत नेहमीच होणारा हद्दीचा वाद.
देवळाली कॅम्प परिसरातील सौभाग्यनगरजवळ शुक्रवारी घडलेल्या या घटनेने खाकी वर्दीची भावनाशून्यता उघड होऊन संवेदनशील नागरिकांचा अक्षरशः संताप झाला. पोलिस ठाण्यांच्या हद्दीच्या वादात एका निष्पाप माणसाला अकारण जीव गमवावा लागला. परेशकुमार झुंबरलाल दायमा (रा. चाळीसगाव) असे त्या दुर्दैवी व्यक्तीचे नाव. जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्याची जबाबदारी नाशिकरोड देवळाली कॅम्प पोलिसांनी वारंवार एकमेकांवर ढकलली. नियंत्रण कक्षाच्या संदेशाची वेळीच दखलही घेतली गेली नाही. त्यामुळे रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध झाली नाही. अंती, सकाळी वाजेपासून भर उन्हात तडफडत मृत्यूशी झुंज देणाऱ्या दायमा यांनी सुमारे पाच तासांनंतर सकाळी अकराच्या सुमारास जगाचा निरोप घेतला. इकडे पाेलिस यंत्रणेला त्या जखमी जिवाचे काय झाले, याची चौकशी करायलाही फुरसत नव्हती. नाशिकरोडचे पोलिस त्या निश्चल देहाजवळ तब्बल तीन तासांनी, म्हणजे दुपारी वाजून ५० मिनिटांनी दाखल झाले.

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था उत्तम असल्याचा डांगोरा नेहमीच पिटला जातो, पण याच महाराष्ट्रात हळहळ वाटायला लावणारी ही घटना घडली. मध्य रेल्वे रुळाजवळील हगवणे मळ्याच्या बाजूला एक प्रवासी जखमी अवस्थेत पडलेला असल्याचा संदेश बेलतगव्हाण गेटवरील कर्मचाऱ्यांनी देवळाली रेल्वेस्थानकाचे अधीक्षक एस. के. यादव यांना दिला. त्यांनी तत्काळ तो नाशिकरोडच्या उपअधीक्षकांना देऊन सकाळी वाजता नाशिकरोड पोलिसांनाही कळवले. मात्र, त्यांनी अगदी तत्परतेने ‘ती हद्द देवळालीची असल्याने त्यांनाच कळवा,’ असे सांगितले. देवळालीच्या पोलिसांनी हात वर करत हद्द नाशिकराडेचीच असल्याचा मुद्दा उपस्थित केला. तब्बल दोन तास पोलिस ठाण्यांमध्ये हे हद्दयुद्ध पेटले होते. त्यामुळे अखेर रेल्वे पोलिसांनी नियंत्रण कक्ष रुग्णवाहिकेच्या १०८ १०६ या क्रमांकांवर संदेश दिला. रुग्णवाहिका क्रमांकांवरही वेळेवर प्रतिसाद मिळाला नाही.