आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीत बाहेरगावी जा; पण खबरदारी घेऊनच; चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांचे नियोजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- दिवाळीत गावी किंवा सहलीसाठी जाणाऱ्या नागरिकांना जेव्हा त्यांच्या माघारी घरफाेडी वा चाेरी झाल्याचे कळते, तेव्हा त्यांच्या अानंदावर विरजण तर पडतेच; शिवाय त्यावर्षी दिवाळी दु:खदायकही ठरते. नेमके या काळातच दिवसा रात्री घरफोडीचे गुन्हे वाढत असल्याने पोलिसांनी विशेष पथकाची गस्त सुरू करण्याचा निर्णय घेतानाच नागरिकांना बाहेरगावी जाताना जवळील पोलिस ठाण्यात माहिती देण्याचे आवाहन केले आहे. तसेच, बाहेरगावी जाताना काेणती खबरदारी घ्यावी हेही सांगितले अाहे. 

दिवाळी अ‌वघ्या दहा-बारा दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी घराेघरी नियोजन सुरू आहे. कुणी आपल्या मूळगावी, तर कुणी देश-विदेशात सहलीसाठी जाण्याचे ठरवत अाहेे. याच काळात घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याचा पोलिसांचा दरवर्षीचा अनुभव आहे. हे रोखण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सर्व अधिकाऱ्यांना उर्वरित.पान 

नागरिकांच्या सहकार्याने गुन्हे रोखणे शक्य 
दिवाळीचा सण साजरा करताना सतर्कता बाळगावी. बाहेरगावी जाताना पोलिसांना कळवावे. परिसरात विशेष पथकाची गस्त राहणार आहे. अाजूबाजूला संशयित व्यक्ती दिसल्यास पोलिसांना कळवावे. आपल्या सुरक्षेसाठी पोलिस सदैव तत्पर आहेत. नागरिकांच्या सहकार्याने गुन्हे रोखणे शक्य आहे. 
- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त 

शेजारी खरा पहारेकरी 
घरफोडीचे गुन्हे रोखण्यासाठी ‘आपला शेजारी खरा पहारेकरी’ ही संकल्पना पोलिस राबवत आहेत. शेजारच्या बंद घरामध्ये काही अनुचित प्रकार घडत असल्यास तत्काळ नियंत्रण कक्षाला ०२५३-२३०५२३३,२३४ अथवा १०० याक्रमांकांवर अथवा जवळील पोलिस ठाण्याच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. 

अशी घ्या खबरदारी 
- बाहेरगावी जात असल्यास शेजारच्यांना सांगून जा. त्यांचा संपर्क क्रमांक घ्या त्यांना तुमचा द्या. जेणेकरून घरामध्ये काही अनुचित प्रकार घडल्यास तत्काळ संपर्क साधता येईल. 
- घराच्या खिडक्या, दारांना सेफ्टी दरवाजे बसवावे. 
- सोसायटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावावा. सुरक्षारक्षक ठेवावा. अनोळखी व्यक्तीला प्रवेश देऊ नये. 
- मदतीसाठी असलेले पोलिसांचे क्रमांक दर्शनी ठिकाणी लावावे. 
बातम्या आणखी आहेत...