आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाळेधारकांपुढे पालिका-पोलिसांचे लोटांगण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेने अनधिकृत ठरवूनही त्र्यंबकरोडवरील वर्दळीच्या जागेतच गणेशमूर्ती विक्रेत्यांनी गाळ्यांची मागणी लावून धरल्याने अखेर पालिका व पोलिस यंत्रणेने त्यांच्यापुढे लोटांगण घातले. ईदगाह मैदानाची जागा देण्यास मुस्लिम बांधवांनी दिलेला नकार, जिल्हा रुग्णालयाच्या शल्यचिकित्सकांनी रुग्णांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या अटीवर दिलेली सवलत या मुद्यांचा विचार करता, महापौर अ‍ॅड. यतनि वाघ यांनी ढोल-ताशे, मिरवणूक न काढता गणेशमूर्ती विक्री करण्यासाठी गाळे उभारणीला मान्यता दिली.
विधानसभा नविडणुकीच्या तोंडावर कार्यकर्ते असलेल्या विक्रेत्यांना दुखवणारे परवडण्याजोगे नसल्यामुळे संयुक्त बैठकीची शक्कल याप्रश्नी काढण्यात आली. त्यानुसार, महापौर अॅड. यतनि वाघ, पालिका आयुक्त सोनाली पोंक्षे, उपायुक्त दत्तात्रय गोतिसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले, गाळेविक्रेते प्रतिनिधी बबलू शेलार यांच्यासह विक्रेत्यांची बैठक झाली. यात विक्रेत्यांनी गाळे स्थलांतरित करणे वेळेअभावी शक्य नसून, शांतता क्षेत्रात यापूर्वी नाशिक फेस्टवि्हलसह झालेल्या अनेक कार्यक्रमांना कशी परवानगी दिली, असा सवाल केला. डॉ. माले यांनी जिल्हा रुग्णालयातील प्रवेशद्वार बंद होणार नाही याची दक्षता घेतली तर हरकत नसेल, असे सांगितले. त्यानंतर महापौरांनी शांततेचा भंग होणार नाही, या अटीवर ढोल-ताशांना बंदी घालून मूर्ती विक्रीस परवानगी दिली.

पोलिस आयुक्त सरंगल यांचा थेट आरोप
जिल्हा रुग्णालय परिसरात गणेशमूर्ती विक्रेत्यांनी गाळे बांधण्यावरून निर्माण झालेल्या वादात सामान्य रुग्णांची फरफट सुरूच आहे. याबाबत पालिकेच्या मालकीच्या जागेत गाळे उभारतानाच प्रशासनाने लक्ष दिले असते तर हा विषय उदभवलाच नसता, असे पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी सांगत पालिका याबाबत केवळ नागरिकांची दिशाभूल करत असून, पोलिसांकडे बोट दाखवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
तीन वर्षांपासून गणेशमूर्ती विक्रेत्यांच्या गाळ्यांवरून निर्माण हाेणारा वाद यंदाही कायम आहे. जिल्हा रुग्णालय परिसरात विक्रेत्यांनी परवानगी न घेता गाळे थाटून मूर्ती आणून ठेवल्या आहेत. दुसरीकडे शांतता क्षेत्रात गाळे उभारण्यास मनाई असतानाही विक्रेत्यांनी गाळे उभारल्याने पालिकेकडून हे गाळे अनधिकृत असल्याने त्यावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी भूमिका घेतली गेली. यावर पोलिसांनी ही जागा पालिकेच्या मालकीची असून, त्यांनीच अतिक्रमण हटवावे, असे सुचविले. यामुळे दाेघांच्या वादात गाळेधारकांना फावून त्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही गाळ्यांमध्ये गणेशमूर्ती विक्रीसाठी आणून ठेवल्या. यासंदर्भात पोलिसांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली जात असतानाच, सरंगल यांनी उघडपणे पालिकाच या प्रश्नी िदशाभूल करीत असल्याचा आरोप केला. पालिकेकडून ६ आॅगस्ट राेजीच ईदगाह मैदानावर या विक्रेत्यांना परवानगी देण्यासाठी ना हरकत मागितल्याचे सांगत त्यांनी हेतुत विलंब केल्याने वाद निर्माण झाल्याचा दावा केला. त्यावरही सरंगल यांनी मुळात जागामालकाला परवनागीची गरजच नाही. शांतता क्षेत्रात तर परवानगी मागण्याचा विषयच नसून, पर्यायी जागेचा विषयही त्यांच्या अखत्यारित आहे. त्याचप्रमाणे या गाळे बांधणाऱ्यांविरुद्ध सरकारवाड्यात तक्रार अर्ज दिला. त्याएेवजी सरळ गुन्हा दाखल करण्याची मागणी पालिका अधिकाऱ्यांनी केली असती तर गुन्हाही दाखल झाला असता.