आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुधारगृहातून पळालेली १० मुले अखेर ताब्यात, नाशकात दुकान फाेडल्याचेही उघड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - किशोर सुधारालयातून फरार झालेल्या बारापैकी दहा विधिसंघर्षग्रस्त मुलांना पुणे जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात पाेलिसांना यश अाले अाहे. सोमवारी मध्यरात्री सुधारालयाची पंधर फुटांची भिंत मानवी मनोरा आणि चादरीच्या दोरखंडाद्वारे सर करत ही बाराही मुले फरार झाली हाेती. त्यापैकी दाेघांचा अद्याप शाेध लागलेला नाही. दरम्यान, सुधारगृहातून पलायन केल्यानंतर यापैकी काही मुलांनी नाशिकच्या मखमलाबाद रोडवरी एक दुकान फोडल्याचे पोलिसांनी सांगितले. तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चार संशयितांच्या हालचाली कैद झाल्या अाहेत.
सोमवारी नाशिकमधील सरकारवाडा पोलिसांचे पथक पुणे येथे रवाना झाले. निगडी येथून दोघांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर पथकाने पुणे पोलिसांच्या मदतीने हडपसर, आळंदी, नारायणगाव, चाकण परिसरातून इतर आठ मुलांना ताब्यात घेण्यात अाले. वरिष्ठ पाेलिस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. दाेन फरार मुलांचे वर्णन राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांना कळवण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेच्या निमित्ताने सुधारालयातील सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले अाहे. या सर्व मुलांवर खून, दरोडा, प्राणघातक हल्ला यासारखे गंभीर गुन्हे दाखल अाहेत.
पोलिस अधिकाऱ्यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर हे किशोर सुधारालय आहे. नवीन मध्यवर्ती बसस्थानकात रात्रभर प्रवाशांची वर्दळ सुरू असते. याच दरम्यान खाकी हाफपँट व पांढऱ्या रंगाची बनियन घालून फरार झालेल्या मुलांचा कुणालाच कसा संशय अाला नाही, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झाला अाहे.
बातम्या आणखी आहेत...