आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Arrested Duplicate Sadhus In Nashik Kumbhamela

पोलिस ‘साधूं’नी केले संधि‘साधू’ना जेरबंद, आखाड्यात सेवेकरी म्हणून होते वास्तव्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - साधुग्राम मध्येतैनात साधूच्या वेशातील पोलिसांनी साधूच्याच वेशातील सहा दरोडेखोरांची टोळी शिताफीने जेरबंद केली. संशयितांकडून प्राणघातक हत्यारे दरोडा टाकण्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले. शनिवारी मध्यरात्री साधुग्राम परिसरात आडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. अंधाराचा फायदा घेत दरोडेखोरांचे काही साथीदार फरार झाले.

पोलिसांचे पथक रात्री गस्त घालत असताना बटुक हनुमान मंदिर परिसरातील सेक्टर बी येथे संशयित चर्चा करताना आढळले. आखाड्यामध्ये सेवेकरी असल्याचे संशयितांनी सांगितले. मात्र, अंगझडतीत त्यांच्याकडे कोयता, चाकू, मिरचीपूड मिळाली. संशयितांनी बलजित सिंग, अरुण सिंग, सुरजित सिंग, अजय गुप्ता, संदीप सिंग, चतुर सिंग (सर्व रा. उत्तर प्रदेश) अशी नावे सांगितली. वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार, उपनिरीक्षक तुषार चव्हाण, अर्जुन बोराडे, गणेश रोकडे, सतीश पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईचे पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी अभिनंदन केले.

आखाड्यात आणखी संशयित
साधुग्राममध्येआखाड्यात सेवेकरी म्हणून सराईत गुन्हेगारांचे वास्तव्य असल्याचा संशय आहे. पकडलेल्या संशयितांकडून नावे पुढे आली आहेत. लवकरच सर्व संशयितांना अटक केली जाईल. अनिलपवार, वरिष्ठ निरीक्षक, आडगाव

"दाढी पथका'ची कारवाई
गुन्हेशोध पथकातील कर्मचाऱ्यांना दाढी-केस वाढवण्याची परवानगी दिलेली आहे. हे पथक पायी गस्त घालत असताना संशयितांना पोलिस असल्याचे समजले नाही. अलगद ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले. काही कर्मचारी गोपनीयरीत्या आखाड्यात राहत आहेत.

साधूंच्या वेशात गुन्हेगारांचा वावर
साधुग्राममधीलआखाड्यात साधूच्या सेवेकऱ्याच्या वेशात गुन्हेगारांचे वास्तव्य असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघड झाले. संशयितांपैकी काही अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. पोलिस पथक त्यांचा शोध घेत आहे.