आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२५ लाख रुपयांचे वाघाचे कातडे विक्री करणारा पोलिसांच्या पिंजऱ्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - फॅशन डिझायनर युवक सुमारे २५ लाख रुपये किमतीचे वाघाचे कातडे विक्री करण्याच्या प्रयत्नात असतानाच पाेलिसांनी त्यास सापळा रचून अटक केली. बुधवारी दुपारपासूनच पाेलिसांनी संशयितास ताब्यात घेत चाैकशीअंती रात्री गुन्हा दाखल करण्यात अाला. सदर युवक कॉलेजरोडवर हे कातडे विक्रीसाठी येताच पथकाने ही कारवाई केली.
पाेलिसांनी केलेल्या चाैकशीत संशयिताचे नाव ओमकार राजेंद्र आहेर (वय १९, रा. गजरा पार्क, कमोदनगर, इंदिरानगर) असे असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पाेलिस उपअायुक्तांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या गुन्ह्याचा उलगडा करण्यात अाला अाहे.

एका बातमीदारा मार्फत वरिष्ठ पाेलिसांना खबर मिळाली की, संशयित वाघाचे कातडे विक्री करण्याकरिता काॅलेजराेडवर येणार अाहे. त्याअाधारे पाेलिसांनी साध्या वेशातील अापल्या दाेघा कर्मचाऱ्यांनाही कातडी खरेदी करणाऱ्या व्यक्तीसाेबत व्यवहार सुरू असतानाच त्यास जास्तीत जास्त वेळ गुंतवून ठेवण्याची सूचना केली. त्यानुसार संशयित अाहेर याने खरेदीदारांना बॅगमध्ये असलेले वाघाचे कातडे दाखवित २५ लाखांवर व्यवहार निश्चित करण्याचे ठरविले. अखेरीस पाेलिसांनी अचानक धडक मारत त्यास बॅगसह ताब्यात घेण्यात अाले. पोलिसांनी सलग दहा तास चाैकशी केल्यानंतर अापल्या घरात वडिलाेपार्जित हे कातडे असून, त्याबाबत अधिक माहिती नसल्याची त्याने भूमिका घेतली. मात्र, याबाबत काहीही नाेंद नसल्याचेही त्याने सांगितले. उपनिरीक्षक वाय. डी. उबाळे, उमेश सोनवणे, सागर चव्हाण, सचिन अहिरराव, दिलीप शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

संशयित नाशिकरोड येथील एका फॅशन डिझायनिंग महाविद्यालयात शिक्षण घेत असून, त्याच्यासाेबत अाणखी काेणी साथीदार अाहे का? त्याने ही कातडी नेमकी काेणाकडून अाणली, यापूर्वी असा काही व्यवहार केला अाहे का? याचा शाेध घेतला जात असल्याचेही सांगण्यात अाले. त्याच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात अाला असून, त्यास शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार अाहे.

हैदराबाद येथे तपासणी : उपअायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक अायुक्त डाॅ. राजू भुजबळ, वरिष्ठ निरीक्षक डाॅ. सीताराम काेल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गु्ह्याचा तपास सुरू अाहे. दरम्यान, पाेलिसांनी ताब्यात घेतलेले वाघाचे कातडे हे नेमके किती वर्षांच्या वाघाचे अाहे, त्याच्या पडताळणीसाठी हैदराबाद येथील वनखात्याच्या प्रयाेगशाळेत पाठविण्यात येणार असल्याचेही सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे साधारणत: सात वर्षांपूर्वी एका निलंबित पाेलिस अधिकाऱ्याच्या गंगापूरराेडवरील नवश्या गणपती भागातील अालिशान बंगल्यात सापडलेल्या वाघाच्या कातड्याची चर्चा सुरू झाली.
बातम्या आणखी आहेत...