आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगला एक्स्प्रेस, पंजाब मेलची पोलिसांद्वारे सुरक्षेसाठी तपासणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पंजाबमधील पठाणकोट येथील हवाई दलाच्या महत्त्वाच्या असलेल्या सैनिकी तळावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर पोलिसांनी सुरक्षेमध्ये वाढ केली आहे. रविवारी नाशिकरोड येथे दिल्लीहून येणाऱ्या मंगला एक्स्प्रेस आणि पंजाब मेल या दोन्ही प्रवासी गाड्यांची रेल्वे पोलिसांनी कसून तपासणी केली. या वेळी प्रवाशांनीही तपासणीसाठी सहकार्य करीत असल्याचे चित्र रेल्वे स्थानकावर दिसून येत होते.
शनिवारी पठाणकोट येथील हवाई तळावर अतिरेक्यांनी हल्ला केल्यानंतर देशातील महत्त्वपूर्ण स्थळांवर सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली. दिल्लीहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची तपासणी करण्यात येत होती. नाशिकरोड रेल्वे स्थानकावर रविवारी पहाटे मुंबईकडे जाणारी मंगला एक्सप्रेसची रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलिसांनी पाच ते सात वाजेपर्यंत पूर्ण तपासणी केली. पंजाब मेलची सकाळी ८.२२ ते ९.५५ पर्यंत तपासणी करण्यात येत होती. या वेळी पोलिसांनी सर्व प्रवाशांना सामान, वस्तू घेऊन फलाटावर उतरून गाडीची श्वानपथक आणि बाॅम्बशोधक यंत्राच्या साहाय्याने तपासणी केली. या वेळी प्रवाशांना स्पीकरच्या माध्यमातून सूचना देण्यात येत होत्या. त्यामुळे देशाची सुरक्षालक्षात घेता प्रवाशांनी सहकार्य केले. स्थानिक गाड्या या वेळेवर जात असल्याचे नाशिकराेड रेल्वे स्थानकावरील कर्मचाऱ्यांनी सांगितले. या वेळी रेल्वे सुरक्षा दलाचे पोलिस निरीक्षक बी. डी. इप्पर, उपनिरीक्षक आर. के. सिंग, सहायक पोलिस निरीक्षक महाले यांनी गाड्यांची तपासणी केली.
बातम्या आणखी आहेत...