आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Combing Operation Issue At Nashik, Divya Marathi

नाशिकमध्‍ये पोलिसांचे पुन्हा कोम्बिंग ऑपरेशन; 50 गुन्हेगार ताब्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यास पोलिसांना आलेले अपयश बघता पोलिस आयुक्तांच्या आदेशावरून पुन्हा कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. परिमंडळ-1च्या हद्दीत 50 गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले, तर 70 टवाळखोर आणि 60 वाहनांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली.

शहर पोलिस मुख्यालयात मागील काही दिवसांपासून सातत्याने घडत आहेत. वाढते गुन्हे रोखण्यात पोलिस प्रशासनास अपयश येत आहे. यातच वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्याने गुन्हेगार सक्रिय झाले होते. या वाढत्या घटनांमुळे नागरिकांनी पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांना यासंदर्भात निवेदन दिले होते. त्याची दखल घेत मंगळवारी परिमंडळ-1च्या हद्दीतील झोपडपट्टीमध्ये वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या उपस्थितीत भरदिवसा हे कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले.

सहायक आयुक्त गणेश शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश पाटील, शांताराम अवसरे, हेमंत सोमवंशी, शंकर काळे, बाजीराव महाजन यांच्यासह 150 हून अधिक कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.