आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Comissinor Tight Rol Of Indiranagar Way Mater

बाेगदाप्रश्नी पाेलिस अायुक्तांची भूमिका ताठरच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पंधरादिवसांपासून बंद करण्यात अालेला इंदिरानगरचा दाेन अामदार, महापाैर, स्थानिक नगरसेवकांच्या सूचनांना वाटाण्याच्या अक्षता; अांदाेलन तीव्र हाेणार खुला करण्याच्या मागणीसाठी महापाैर अशाेक मुर्तडक यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नगरसेवकांनी पाेलिस अायुक्त एस. जगन्नाथन यांची बुधवारी (दि. २९) पुन्हा भेट घेतली असता बाेगदा खुला करण्यावर ते ठाम असल्याचे दिसून अाले. यामुळे संतप्त झालेल्या लाेकप्रतिनिधींकडून न्यायालयीन लढ्याबराेबरच पाेलिसांच्या ताठर भूमिकेच्या निषेधार्थ अांदाेलन तीव्र करण्याचा निर्धार करण्यात अाला.
महामार्ग प्राधिकरण अायअायटीच्या तज्ज्ञांच्या अादेशानुसार, वाहनधारकांच्या साेयीसाठीच बाेगदा बंद करण्यात अाल्याचे सांगत तूर्त तरी बाेगदा सुरू करता येणार नसल्याचे अायुक्त जगन्नाथन यांनी शिष्टमंडळाला सांगितले. याबाबत अापण स्वत:च स्थानिक रहिवासी, वाहनधारकांशी संवाद साधून त्यांनाही वाहतूक काेंडी दूर करण्यासाठी हा उपाय याेग्य असल्याचे पटवून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. इंदिरानगर बाेगदा बंद केल्याच्या निषेधार्थ स्थानिक रहिवासी, लाेकप्रतिनिधींकडून दरराेज विविध अांदाेलने सुरू अाहेत. यासंदर्भात अामदार प्रा. देवयानी फरांदे, अामदार सीमा हिरे, महापाैर अशाेक मुर्तडक यांनीही अायुक्त, उपअायुक्तांना लाेकभावनेचा अादर करून बाेगदा किमान एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्याची सूचना केली. मात्र, त्यावर अंमलबजावणी हाेत नसल्याने रहिवाशांमधील संताप तीव्र हाेत अाहे. दरम्यान, पाेलिसांकडून गेल्या अाठ दिवसांपासून वाहनधारकांच्या हरकती, सूचना मागविण्यात अाल्या अाहेत. सुरुवातीला पाेलिसांकडून १५ िदवसांत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात अाल्याने बुधवारी ताे कालावधी पूर्ण झाल्याने नगरसेविका दीपाली कुलकर्णी,

निर्णयासाठी बैठक झाली
इंदिरानगरबोगदा ‌खुला करण्याबाबत या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. इंदिरानगर पोलिसांची भूमिका ही प्रश्न सोडविण्याची वाटली. मात्र, वरिष्ठांच्या भूमिकेनंतरच अंमलबजावणी होऊ शकते. संजयगायकर, मध्य नाशिक विधानसभा प्रमुख, शिवसेना

जनभावनेचा आदर करावा
नागरिकांच्याभावनेचा आदर करून बोगदा सुरू करावा. अन्यथा नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागेल. प्रशासनाने अन्य जबाबदार व्यक्तींनी कारणे सांगू नयेत. सतीशसोनवणे, नगरसेवक

प्रश्नाचे गांभीर्य नाही
हाप्रश्न सोडविण्यासाठी तीन वेळा पोलिस आयुक्तांशी चर्चा केली. मात्र, त्यांची भूमिका ताठर असून, नागरिकांच्या प्रश्नाचे गांभीर्य दिसत नाही. दीपालीकुलकर्णी, नगरसेविका

पालकमंत्र्यांकडे दाद मागू
पाेलिसयंत्रणेकडून लाेकप्रतिनिधी रहिवाशांच्या भावनांचा विचार केला जात नसेल त्यांच्या या अाडमुठेपणाचा निषेध करताे. याबाबत पालकमंत्र्यांकडे दाद मागणार अाहे. विजयसाने, ज्येष्ठ नेते, भाजप

हरकतींचे नाटक का?
पाेलिसअायुक्तांकडून रहिवाशांच्या हरकती वाहनधारकांचे अर्ज भरून घेण्यामागे केवळ अाैपचारिकताच पूर्ण करण्यात अाली का, असा संतप्त सवाल उपस्थित करीत पाेलिसांकडून लाेकप्रतिनिधींचा अनादर केला जात असल्याचीही प्रतिक्रिया लाेकप्रतिनिधींनी व्यक्त केली.