आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध धंद्यांची माहिती द्या ‘व्हॉट्स‌अॅपवर’, पोलिस आयुक्त डॉ. सिंघल यांची संकल्पना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सणोत्सवास सुरुवात झाली आहे. या काळात घडणारे गुन्हे रोखण्यासाठी आणि परिसरातील अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस आयुक्तांनी थेट नागरिकांनाच थेट तक्रार करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. कुठल्याही स्वरूपाच्या तक्रारी आता व्हॉट्सअॅसपवर देणे शक्य होणार अाहे. यासाठी पाेलिस नियंत्रण कक्षात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या सर्व तक्रारींची तत्काळ दखल घेण्याचे आदेश पोलिस अधिकाऱ्यांनी दिले आहेत. शहर परिसरातील नागरिकांना आता पोलिस आयुक्तांशी थेट संपर्क साधत आपल्या तक्रारी मांडता येणार आहे. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी ही अभिनव संकल्पना प्रत्यक्ष अमलात आणली आहे. ९७६२१००१०० या मोबाइल क्रमांकावर पोलिस आयुक्तांशी थेट संपर्क साधून आपल्या परिसरातील गैरप्रकारांची माहिती देणे आता सर्वच नागरिकांना शक्य होणार आहे. मंगळवारी (दि. ६) नियंत्रण कक्षात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. येथे तंत्रज्ञानात प्रशिक्षित पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या मोबाइलवर येणारे सर्व संदेश पोलिस आयुक्त स्वत: दखल घेत त्यावर तत्काळ कारवाई करणार आहे. असुरक्षित वाटणाऱ्या नागरिक, महिला, मुलींना या मोबाइल नंबरवर घटनास्थळाचे फोटो काढून पाठवल्यास काही वेळात पोलिसांची मदत मिळणे शक्य होणार आहे. पीडित व्यक्तीला मदतीसाठी तत्काळ पोलिस तत्पर राहणार आहेत. अवैध धंद्याबाबत माहिती, गैरप्रकारांची माहिती, टवाळखोरांची माहिती, समाजास घातक असलेली कुठलीही माहिती नागरिक या नंबरद्वारे पोलिसांपर्यंत पोहोचू शकणार आहेत.

नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे
शहरातील कुठेही अनुचित प्रकार घडत असल्यास नागरिकांनी दिलेल्या नंबरवर कळवावे. ही सर्व माहिती गोपनीय ठेवली जाणार आहे. शहरात घडत असलेले गैरप्रकार रोखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे. या सुविधेचा लाभ घ्यावा. नागरिकांनी सुरक्षेसाठी पोलिसांना सहकार्य करावे. -डॉ. रवींद्रकुमार सिंघल, पोलिस आयुक्त
बातम्या आणखी आहेत...