आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Police Commissioner Kulwant Sarangal,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुरक्षेत हवा सर्वांचाच पुढाकार, आयुक्त सरंगल यांचे नागरिकांना आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नागरिकांनीसतर्कता बाळगून स्वत:ची जबाबदारी कशी पार पाडावी, हा महत्त्वपूर्ण संदेश जनजागृतीच्या कार्यक्रमातून मिळत आहे. सामान्यांच्या सुरक्षेसाठी रोटरी क्लब ऑफ नाशिक एलाईटचा प्रयत्न अनुकरणीय आहे. नागरिक पोलिसांतील सुसंवाद चांगला असल्यास गुन्हेगारी कमी होण्यास हातभार लागेल. परिसरात कोणी अनोळखी व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी त्वरित जवळील पोलिस ठाण्याला माहिती द्यायला हवी. जेणेकरून पुढील घटना टळू शकतात, असे आवाहन पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ नाशिक एलाईट, न्यू इरा इंग्लिश स्कूल ‘दिव्य मराठी’तर्फे सीबीएस परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत आयोजित ‘नागरिक जनजागृती फलक’च्या उद्धाटनावेळी सरंगल बोलत होते. रोटरी क्लब ऑफ नाशिक एलाईटचे सचिव साजिद मन्सुरी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपमहाव्यवस्थापक संजय श्रीवास्तव, रोटरी क्लब ऑफ नाशिक एलाईटचे सदस्य पुरुषोत्तम लालवाणी, जोहर सरिया, संकेत कलचोरी, डॉ. एम. अग्रवाल आदी उपस्थित होते. दरम्यान, न्यू इरा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थांनी सीबीएस सिग्नलवर वाहतूक नियमांचे अज्ञान आणि पोलिस कारवाईबाबतचे गैरसमज दूर करून जनतेत वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती केली. रस्ते वाहतूक नियम पालनाच्या घोषणा देऊन आणि माहितीफलकांद्वारे या वेळी जनजागृती करण्यात आली.
बँकांमध्ये२०० फलक
शहरातीलसोनसाखळी चोरी, लूट अशा घटनांमध्य काही दिवसांपासून वाढ झाली आहे. अशा घटना घडू नयेत यासाठी नागरिकांनी काय काळजी द्यावी, कोणाशी संपर्क साधावा, याबाबतच्या माहितीचे २०० फलक शहरातील विविध बँकांमध्ये लावण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात स्टेट बँकेचे मुख्य शाखा येथून बुधवारी पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच संपूर्ण आठवड्याभरात शहरातील एकूण दोनशे विविध बँकांत एटीएम केंद्रांच्या बाहेर हे फलक लावण्यात येणार आहेत.
नियमांचे पालन करणा-यांना भेट
यावेळी रोटरी क्लब नाशिक इलायीट न्यु ईरा इंग्लिश दिव्य मराठी यांच्यातर्फे सीबीएस चौकात विद्यार्थ्यांच्या वतीने हेल्मेट वापरणा-या, तसेच सीट बेल्ट लावणा-याला चॉकलेटची भेट देण्यात येत होती.
नियमांचे पालन करून हेल्मेटचा वापर करणा-या वाहनचालकांना सीबीएस चौकात विद्यार्थ्यांनी चॉकलेट देऊन प्रोत्साहन दिले. या वेळी उपस्थित असलेले पोलिस अधिकारी, कर्मचारी शिक्षकवृंद.

सीट बेल्टचा वापर हवा
मी कधीही सीट बेल्ट वापरता गाडी चालवत नाही. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर सर्वांनाच सीट बेल्ट वापरण्यास सांगतो. अनिलआगीवाले, वाहनचालक

सीबीएस येथील स्टेट बँकेच्या शाखेत बुधवारी नागरिकांच्या जनजागृतीसाठी फलक लावण्यात आले. या वेळी मार्गदर्शन करताना पोलिस आयुक्‍त कुलवंतकुमार सरंगल. समवेत स्टेट बँकेचे सहायक महाव्यवस्थापक संजय श्रीवास्तव आणि रोटरी क्लब ऑफ नाशिक एलाईट न्यू इरा इंग्लिश स्कूलचे