आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अायुक्त जाणून घेणार पाेलिसांच्या तक्रारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पोलिसांवर वाढता ताणतणाव दूर करण्यासाठी विविध उपक्रम सुरू आहेत. या उपक्रमास कर्मचाऱ्यांसह कुटुंबीयांकडून प्रतिसाद मिळत आहे. ज्या प्रकारे नागरिकांच्या तक्रारींची दखल आयुक्तांकडून घेण्यात येत आहे, याचप्रमाणे आता कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक तक्रारीसाठी ९७६२२००२०० हा व्हाॅट्सअॅप नंबर सुरू करण्यात आला आहे. या नंबरच्या अाधारे आता पोलिस कर्मचाऱ्यांना थेट आयुक्तांकडे तक्रार करणे सोपे होणार आहे. या नंबरवर कुठल्या तक्रारी येतात आणि कुठल्या अधिकाऱ्याच्या विरोधात येतात, हे बघणे आता रंजक ठरणार आहे.
पोलिसांवर वाढता कामाचा ताण दूर करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे वाढदिवस साजरे करणे, कुटुंबीयांना सिनेमाची सफर घडवणे, आरोग्य तपासणी शिबिर आणि नुकतेच कोजागरी पौर्णिमेनिमित्त पोलिसांनी स्नेहमिलन कार्यक्रमांमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधील दरी काही प्रमाणात का होईना कमी झाली अाहे. कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा, सिक रजा, वैद्यकीय रजा आणि ड्यूटीबाबत बऱ्याच तक्रारी असतात. वरिष्ठांकडून कर्मचाऱ्यांचा नेहमीच छळ होत असतो. मात्र, शिस्तीचे खाते आणि कारवाईच्या भीतीने बहुतेक कर्मचाऱ्यांकडून वरिष्ठांच्या विरोधात तक्रार केली जात नाही. त्यामुळे मानसिक त्रासातून पोलिस कर्मचारी आत्महत्याचे पाऊल उचलतात. काहींना हृदयविकाराचे आजार जडतात. या कर्मचाऱ्यांवर असलेला शारीरिक मानसिक ताण दूर करण्यासाठी आता आयुक्तांनी कर्मचारी अधिकारी यांच्यात सुसंवाद घडावा, यासाठी व्हाॅट्सअॅपवर ‘संवाद’ ग्रुप सुरू केला आहे. याद्वारे आता कर्मचारी आपल्या तक्रारी मांडू शकणार आहे. हाच नंबर निर्भयाच्या तक्रारींसाठी कायम ठेवला जाणार आहे. या नंबरवर व्हाॅट्सअॅप सुविधा सुरू केली आहे. नंबरवर येणाऱ्या तक्रारींची दखल थेट आयुक्त घेणार असल्याने कर्मचाऱ्यांची अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांची आता आयुक्तांकडून ‘नाकेबंदी’ केली जाणार असल्याने या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

तक्रारींची तत्काळ दखल घेणार
^पाेलिस कर्मचाऱ्यांच्याअसंख्य तक्रारी असतात. यातील काही तक्रारी प्रामाणिक असतात. वरिष्ठांकडून अडवणूक झाल्यास कर्मचारी खचून जातो. या तक्रारी सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. -डॉ. रवींद्रकुमार सिंघल, पाेलिस आयुक्त

अधिकारी, कर्मचारी रडारवर
अधिकाऱ्यांच्या मर्जीतील कर्मचाऱ्यांकडून बेकायदेशीर कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांसह मर्जीतील कर्मचारी कारवाईच्या रडारवर राहणार आहे. नवीन अधिकारी आल्यानंतर मागे-पुढे फिरणाऱ्या आणि अनेक वर्षांपासून सुरू असलेली या कर्मचाऱ्यांची मक्तेदारी आता मोडीत निघणार असल्याने अायुक्तांच्या या उपक्रमाचे कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे.
बातम्या आणखी आहेत...