नाशिक- उड्डाणपुलावर दुचाकीसह तीनचाकी वाहनांना प्रवेश बंद असूनदेखील दिवसभरात बहुतांशी वाहने उड्डाणपुलावरून मार्ग काढत असल्याचे निदर्शनास येत आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी वाहतूक शाखेकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई होण्याची अपेक्षा आहे. उड्डाणपुलावरून सुरक्षेच्या कारणास्तव दुचाकी, तीनताकी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. उड्डाणपुलाच्या लोकार्पणाच्या दिवशी घडलेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. याची गंभीर दखल घेत पोलिस प्रशासनाकडून उड्डाणपुलावरून दुचाकीसह रिक्षांनाही प्रवेश बंद केला. काही दिवस या नियमांचे पोलिसांकडून आणि वाहनधारकांकडून काटेकोरपणे पालन केले गेले. मात्र, याचा सर्वांनाच विसर पडलेला दिसतोय. जीव मुठीत धरून दुचाकीचालक उड्डाणपुलावरून जे-जा करतात. विधानसभा निवडणूक अाचारसंहिता सुरू आहे. पोलिस बंदोबस्तात व्यस्त असल्याने नियमांचे सर्रास उल्लंघन होताना निदर्शनास येत आहे.
कारवाई करणार
उड्डाणपुलावररिक्षा, दुचाकी वाहनांना प्रवेश बंद आहे. दुर्घटना टाळण्यासाठी नियम केले आहेत. उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. रमेशपाटील, वरिष्ठनिरीक्षक, वाहतूक शाखा पूल संपतो तिथे पोलिस पथक के.के. वाघ उड्डाणपूल उतरतेवेळी वाहतूक कर्मचारी तेथे असतात. आर्थिक तडजोड करून वाहनधारकांना सोडून देण्यात येते.
या भागात होते सर्वाधिक वाहतूक
के.के. वाघ ते द्वारका जंपिंग ते भुजबळ फार्म आणि पुढे थेट गरवारे पॉइंटपर्यंत रिक्षा आणि दुचाकी उड्डाणपुलावरून ये-जा करताना आढळून येतात