आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे स्थानकावर बॉम्बस्फोट, दोन दहशतवाद्यांचा खात्मा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- रात्री१०.३० वाजेची वेळ.. मोठा आवाज होतो.. आवाजाने रेल्वे स्थानकावर पळापळ, आरडाओरड सुरू होते... प्रवासी सामान सोडून..लहान मुले, वृद्धांना घेऊन पळापळ करतात...
पोलिस, फोर्स वन, एनडीआरएफचे जवान स्थानक परिसराचा ताबा घेतात. स्थानकाकडे येणारे रस्ते बंद करून दीड तासाच्या प्रतिकारानंतर दोन दहशतवाद्यांचा खात्मा करतात. या कारवाईत एक पोलिस दोन डझन प्रवासी जखमी होतात, त्यांना तत्काळ महापालिकेच्या बिटको रुग्णालयात दाखल केले जाते... हे काही चित्रपटाचे कथानक नाही, घडलेली घटना नाही तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनांतर्गत पोलिस दलाने शनिवारी रेल्वे स्थानक परिसरात मॉकड्रीलद्वारे दहशतवादविरोधी कारवाईची यशस्वी रंगीत तालीम केली.
कुंभमेळ्यात रेल्वेने देशभरातून हजारो भाविक येणार आहेत. गर्दीचा फायदा उठवून दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट दहशतवादी हल्ला केल्यास ऐनवेळी अशा कठीण प्रसंगाला पोलिस दल कसे सामोरे जाईल, याचा अभ्यास करण्यासाठी ही रंगीत तालीम घेण्यात आली. या कारवाईत पोलिस दलाचा एक कर्मचारी तसेच दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोट गोळीबारात जखमी २१ प्रवाशांना पालिकेच्या बिटको रुग्णालयात दाखल करण्यात येते.
सर्व पथकांच्या शंभरपेक्षा अधिक कर्मचारी दीड तासात मोहीम फत्ते करून ‘जय हिंद’च्या घोषणा देतात. ही रंगीत तालीम बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, सहायक आयुक्त अतुल झेंडे, उपायुक्त श्रीकांत धिवरे, वरिष्ठ निरिक्षक नारायणराव न्याहाळदे उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...