आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावरील निराधारांना पोलिसांकडून मिळाली मायेची ऊब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विविध प्रकारचे गुन्हे हाताळताना पाेलिसांना निराधार मुलांसाठी काही करता येत नाही हे लक्षात घेत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला शहरातील निराधार बालकांना शाल बिस्कीट वाटप करत खऱ्या अर्थाने पोलिसांचे कर्तव्य निभावले. विशेष म्हणजे, त्यांनी सहकुटुंब पोलिस कर्मचाऱ्यांचा वाढदिवस त्यांच्या घरी जाऊन साजरा केला. पोलिसांचे आणि निराधारांचे मनोबल उंचावण्यासाठी असा उपक्रम साजरा करणारे ते पहिलेच पोलिस आयुक्त ठरले. कामाच्याताणामुळे पाेलिस कुटुंबियांपासून दुरावत असून, शारीरिक मानसिक आजार जडत असल्याने पोलिसांचे मनोबल खचत आहे. हे पाहून गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला पोलिस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. डॉ. सिंघल पत्नी विनिता सिंघल यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन कार्यक्रमात सहभागी झाले.

गोदाघाट, आम्रपाली झोपडपट्टी आदी परिसरात रस्त्यावरील निराधार मुलांना शाल बिस्किटांचे वाटप डॉ. सिंघल सौ. सिंघल यांनी केले. महिला बालकल्याण विभागाच्या सचिव सिंघल यांनी निराधार मुलींसह महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच, गांधी जयंतीनिमित्त स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आयुक्तालय आणि पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. सुट्टीचा दिवस असूनही पोलिस आयुक्तांसह सर्व अधिकारी, कर्मचारी या विशेष स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.
निराधारांना आधार देणे हेदेखील एक कर्तव्यच...
^निराधारांना आधार देणे हेदेखील एक कर्तव्य आहे. पोलिस प्रशासनाने हा उपक्रम राबवल्याने निराधारांना दिलासा मिळाला आहे. पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसोबत वाढदिवस साजरा करणे वेगळा आनंद आहे. सण-उत्सवाचे अौचित्य साधून शहरात अशा प्रकारचेे सेवाभावी विविध उपक्रम पुढेही राबवले जाणार आहेत. यात सर्वांनी सहभागी व्हावे. -डॉ.रवींद्रकुमार सिंघल, पोलिस आयुक्त

विशेष उपक्रम राबवणार
^राज्यशासनाच्या महिला बालकल्याण विभागात निराधार बालक आणि महिलांसाठी विविध उपक्रम आहेत. ते व्यापक स्वरूपात राबवण्यासाठी जिल्हा महिला-बालकल्याण विभागांना सूचना दिल्या आहेत. निराधारांसाठी विभागाकडून पुढेही असे उपक्रम राबवले जातील. -विनीता सिंघल, सचिव, महिला बालकल्याण
बातम्या आणखी आहेत...