आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील पोलिस बंदोबस्तात वाढ,ठिकठिकाणी नाकेबंदीसह कोम्बिंग ऑपरेशनही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. धार्मिक स्थळांसह हॉटेल्स, मॉल्स, धर्मशाळा, मंदिरे तसेच सोसायट्यांमधील नागरिकांमध्ये सुरक्षेच्यादृष्टीने कसून चौकशी जनजागृतीही केली जात आहे. अनेक ठिकाणी नाकेबंदीसह कोम्बिंग ऑपरेशनही राबवण्यात येत आहे.

प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याच्या गुप्तचर विभागांच्या सूचनेनंतर देशातील सर्व महत्त्वाची ठिकाणे शहरांत सतर्कता बाळगावी, असा केंद्र शासनाने इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

तीन दिवस ही विशेष सुरक्षा कारवाई सुरू राहणार आहे. गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. अचानक कोम्बिंग ऑपरेशन, ऑलआउट आणि नाकेबंदी यासारखी कारवाई पोलिसांकडून हाती घेण्यात आली आहे.

सोसायट्यांमधील अनोळखी व्यक्ती आणि रहिवाशांचीदेखील चौकशी केली जाते आहे. शुक्रवारी सायंकाळी पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी आयुक्तालयात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सतर्कतेच्या सूचना केल्या. तसेच या सूचनांच्या तत्काळ अंमलबजावणीचे आदेशही त्यांनी दिले. दरम्यान, नाकेबंदीमध्ये सर्वच वाहनांच्या तपासणीचे आदेश वाहतूक शाखेस देण्यात आले आहेत.

या ठिकाणी नजर
वर्दळीच्यासार्वजनिक ठिकाणांसोबतच धार्मिक स्थळांच्याही सुरक्षिततेकडे लक्ष्य द्यावे लागणार असल्याने, शहरातील श्री काळाराम मंदिर, मुक्तिधाम, भक्तिधाम, श्री स्वामीनारायण मंदिर, श्री कार्तिकस्वामी, श्री कपालेश्वर, शहराच्या वििवध भागातील बौद्धविहारांसह मशिदी या प्रत्येक ठिकाणी एक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आला आहे. तसेच, गर्दीच्या ठिकाणी श्वानपथकाद्वारे तपासणी केली जाणार आहे. साध्या वेशातील पोलिसांचीही नजर राहील.