आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पी. एल. ग्रुपशी लागेबांधे, पाेलिस उपनिरीक्षक निलंबित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सातपूर येथील दोघा सराईत गुन्हेगारांच्या खूनप्रकरणी ग्रामीण पोलिस तपास करत असलेल्या संशयित पी. एल. ग्रुपच्या सदस्यांशी लागेबांधे असल्याच्या संशयावरून पोलिस उपनिरीक्षक महेश शिंदे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात अाले अाहे. यासंदर्भात पोलिस अायुक्त एस. जगन्नाथन यांच्या आदेशानुसार रविवारी ही कारवाई करण्यात आली.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सातपूर येथील नगरसेवक प्रकाश लोंढे यांचे नाव असलेल्या पी. एल. ग्रुपच्या कार्यालयात सराईत गुन्हेगार निखिल गवळी अर्जुन आव्हाड या दोघांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. सातपूर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडूनही पोलिसांना याचा थांगपत्ता नसल्याने या प्रकरणात सातपूर पोलिसांची भूमिका संशयास्पद होती. पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी काही अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची गोपनीय माहिती मिळवली होती. या माहितीच्या अाधारे शिंदे हे पी. एल. ग्रुपला मदत करत असल्याचे समोर आले आहे. या कारणावरून पोलिस आयुक्तांनी उपनिरीक्षक शिंदे यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ग्रामीण पोलिस अधिकाऱ्यांनी यास दुजोरा दिला आहे.

काहीपाेलिसांचे फाेन टॅप : दरम्यान,शहर पाेलिसांचे गुन्हेगारांशी असलेले संबंध पुन्हा एकदा उघडकीस अाल्याने पाेलिस यंत्रणेमध्ये खळबळ उडाली अाहे. सुटीचा दिवस असूनही पाेलिस अायुक्तांना प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार उपनिरीक्षक शिंदे यांचे तत्काळ निलंबन करण्यात अाल्याने गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले अाहे. काही कर्मचाऱ्यांचे फाेनही टॅप करण्यात अाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी एका व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी गंगापूर पाेलिस ठाण्यात एका पाेलिस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असतानाच ही कारवाई झाली अाहे.