आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Men Deployed For Godavari Depolution : High Court

गोदावरीचे प्रदूषण रोखण्‍यासाठी पोलिसांची नियुक्त करा : उच्च न्यायालय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी एका पोलिस अधिकार्‍याबरोबर 30 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याची माहिती गोदावरी गटारीकरणविरोधी मंचचे याचिकाकर्ते राजेश पंडित यांनी दिली.
गोदावरीच्या प्रदूषणासंदर्भात उच्च न्यायालयात याचिकेवर सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत गोदावरी प्रदूषित होण्यासाठी महापालिका कशी कारणीभूत आहे, याचे विस्तृत विवेचन गोदावरी गटारीकरण मंचने केले होते. त्याअनुषंगाने आता काय उपाययोजना करता येतील, याबाबत न्यायालय सूचना करीत आहे. त्यानुसार, गेल्या वेळच्या सुनावणीत महापालिकेला निर्माल्य कलश ठेवण्याचे व गोदावरीचे पाणी पिऊ नये, असे फलक लावण्याच्या सूचना केल्या होत्या. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने प्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांची मदत घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रदूषण करणार्‍यांवर फौजदारी वा दंडात्मक कारवाई करता येईल, असे पंडित यांनी सांगितले.