आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिसांची दबंगगिरी; माध्यम प्रतिनिधींसह मतदारांवर चालवला दंडुका, उपनिरीक्षकाचा धुडगूस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयाशेजारील टाऊन हॉल येथील मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लावलेल्या गाड्या पंक्चर करताना पोलिस. तर पोलिस उपनिरीक्षकाने दुचाकींचे प्लगच तोडले... - Divya Marathi
महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयाशेजारील टाऊन हॉल येथील मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लावलेल्या गाड्या पंक्चर करताना पोलिस. तर पोलिस उपनिरीक्षकाने दुचाकींचे प्लगच तोडले...
नाशिक - एकीकडे पाेलिस अायुक्तांकडून मतदारांना निर्भय वातावरणात मतदान करण्याचे जाहीरपणे अावाहन केले जात असतानाच सातपूर विभागात मात्र, मतदानाच्या वेळी पाेलिस कर्मचाऱ्यांच्या ‘दादा’गिरीचा मतदारांना सामना करावा लागला.
 
शिवाजीनगर येथील मतदान केंद्रावर गर्दी झाल्याने गंगापूर पाेलिसांनी साैम्य लाठीमार केला, तर सातपूर मतदान केंद्रावर चक्क उपनिरीक्षक बलराम पालकर व त्यांच्यासाेबतच्या कर्मचाऱ्यांनी मतदारांच्या वाहनांची हवा साेडली. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्रकारासच पालकर यांनी अटकाव करीत जणू एखादा सराईत गुन्हेगारास पकडावे अशाप्रकारे वागणूक दिली.
 
शहरात मतदान प्रक्रिया सुरळीत शांततेत पार पाडण्यासाठी अायुक्तांसह वरिष्ठ अधिकारी डाेळ्यात तेल घालून कार्यरत असतानाच मात्र, सातपूर, शिवाजीनगर भागात वेगळाच अनुभव अाला. काही अधिकारी, कर्मचारी भानच हरवून बसले. मतदानाची प्रक्रियेसाठी नव्हे तर एखाद्या दंगलसदृश परिस्थिती नियंत्रणात अाणण्यासाठी उपनिरीक्षक पालकर त्यांच्या साथीदारांची केल्याचा अनुभव अाला. सातपूर मनपा कार्यालयाजवळील टाऊन हाॅल येथील मतदान केंद्राजवळ मतदारांच्या वाहनांची हवा साेडण्याचा प्लगच्या वायर ताेडण्याचा प्रयत्न पालकर यांच्या अादेशाने करण्यात अाला. 

ही बाब ‘दिव्य मराठी’चे प्रतिनिधी किशाेर वाघ यांनी बघताच त्यांनी माेबाइलमध्ये छायाचित्र कैद करण्याचा प्रयत्न केला. ताेच उपनिरीक्षक पालकर यांच्या जणू अंगात संचारल्याप्रमाणे प्रस्तुत प्रतिनिधींकडे धावून गेले. त्यावर प्रतिनिधीने अापण पत्रकार असून खिशावर निवडणूक अायाेगाने दिलेले अधिकृत अाेळखपत्रही दाखविले. तरीही महाशय एेकण्याच्या मनस्थितीत नसताना माेबाइल हिसकावून फाेटाे जबरदस्तीने उडवून दिले.
 
एवढ्यावरच थांबता पालकर यांनी एखाद्या सराईत गुन्हेगाराला पकडावे तसे प्रतिनिधीची मागून काॅलर पकडून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत जबरदस्तीने पाेलिस गाडीत बसविले. त्यास वाहनात बसवून फिरवण्याचा प्रयत्नही केला. सदर प्रकार अायुक्त रवींद्रकुमार सिंगल उपअायुक्त श्रीकांत धिवरे यांना कळविताच त्यांनी तत्काळ संबंधित उपनिरीक्षकास समज देत तत्काळ प्रतिनिधीला गाडीतून उतरविले. 
 
सहायक अायुक्तांमार्फत चाैकशी 
उपनिरीक्षक पालकरांविराेधात उपअायुक्त धिवरे यांच्याकडे तक्रार करताच त्यांनी तातडीने सहायक अायुक्त अतुल झेंडे यांना या प्रकरणी पालकर यांच्या चाैकशीचे अादेश दिले. या चाैकशीचा २४ तासांच्या अात अहवाल सादर करण्याचे अादेश दिले अाहेत. पालकर याच्या गैरवर्तवणुकीची दखल घेत हा प्रकार गंभीर असून प्रतिनिधीला झालेल्या मनस्तापाबद्दल धिवरे यांनी दिलगिरी व्यक्त केली.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, शिवाजीनगर येथे साैम्य लाठीमार आणि प्रचारात सहभाग घेतल्याच्या कारणावरून घरावर दगडफेक...
 
बातम्या आणखी आहेत...