आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस आयुक्तांची केली जातेय अधिकार्‍यांकडूनच दिशाभूल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस दलात महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या विचारात असणार्‍या आयुक्तांकडे दाेन उपआयुक्त अवैध धंद्यांची सुभेदारी सांभाळणार्‍या काही वरिष्ठ निरीक्षकांकडून सर्व आलबेल असल्याचे चित्र रंगविले जात आहे. त्यामुळे आयुक्त गुन्हेगारी राेखण्यासाठी ठाेस भूमिका घेणार की, या अधिकार्‍यांचे एेकणार याकडे कर्मचार्‍यांसह नागरिकांचेही लक्ष लागले आहे.

खून, दराेडे, लूटमार, साेनसाखळी चाेरीसारख्या गुन्ह्यांची मालिकाच शहरात सुरू आहे. आयुक्त जगन्नाथन यांनी पदभार स्वीकारून दीड महिने उलटले आहे. तरीही त्यांच्या कामाचा फारसा ठसा उमटत नसल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त हाेत आहे. दाेन दिवसांपूर्वी आयुक्तांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेऊन गुन्हेगारी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बंदाेबस्ताविषयी चर्चा केली. या चर्चेतूनही गुन्हेगारी िनयंत्रणात वरिष्ठ अधिकार्‍यांचे दुर्लक्ष, त्यांचे अवैध व्यावसायिकांविराेधात नरमाईचे धाेरण यांसह विविध समस्या, तक्रारींचाच पाढा वाचला गेला. यावर सत्यता पडताळून पाहण्यासाठी आपल्याच अधिकार्‍यांची बैठक बाेलविण्यात आली. यामध्ये मात्र काही वरिष्ठ अधिकार्‍यांकडून उघडपणे दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गेल्या वर्ष-दीड वर्षात आपले जे साम्राज्य निर्माण झाले आहे, त्यास कुठेही तडा जाऊ नये, याची पुरेपूर काळजी घेण्यात आली.

तत्कालीन पोलिस आयुक्तांनाही चुकीची माहिती देऊन आपली ‘तुंबडी’ भरणार्‍या याच दाेन-चार अधिकार्‍यांना पायउतार हाेण्यास भाग पडल्याची चर्चा आहे. त्याच नीतिप्रमाणे नव्या आयुक्तांचीदेखील दिशाभूल करून स्वत:चे महत्त्व वाढविण्याचा प्रयत्न याच अधिकार्‍यांनी सुरू केल्याचे बैठकीत दिसून आले. आयुक्तांच्या दालनात जाण्याआधीच उपआयुक्तांच्या दालनात या चाैकडीची गुप्तगू हाेऊन ठरलेल्या रणनीतीप्रमाणे एक ‘सूचक’ तर दुसरा अनुमोदकाप्रमाणे बैठकीत कामकाज चालविले जाते. अकरा पोलिस ठाण्यांपैकी केवळ चारच अधिकार्‍यांकडून त्यास छेद दिला जात असल्याने त्यांनाच लक्ष्य करण्याचे ही मंडळी कारस्थान रचत असते. त्याचाच प्रत्यय या बैठकीत येत असताे. एकूणच या पार्श्वभूमीवर पाेलिस ठाण्यांमधील सुभेदारी, अवैध व्यावसायिकांशी सूत जमविण्याचा अधिकार्‍यांचा प्रयत्न सीबीआय, इंटेलिजन्सचा कारभार सांभाळणार्‍या आयुक्तांच्या नजरेतून सुटणार की, कर्तव्याला प्राधान्य देत त्यांना बाजूला बसवितात, याकडे लक्ष लागले आहे.

जनसंपर्क अधिकारी पदास विरोध
पोलिसआयुक्तांनी जनसंपर्क अधिकारी नियुक्त करण्याची सूचना िदली. मात्र, या चौकडीने प्रसारमाध्यमांना दूर ठेवा, असे सांगून या प्रस्तावाच्या चर्चेलाच िवराम दिल्याचेही सूत्रांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...