आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३० तासांहून अधिक काळ; दोन हजार पाेलिस रस्त्यावर...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गंगापूर धरणातून साेमवारी दुपारनंतर झालेल्या विसर्गामुळे सायंकाळी वाजेपासून गाेदापात्रातील पाणी वाढत जावून रात्री मुसळधार पावसाचा प्रारंभ हाेताच नदी दुथडी भरून वाहू लागली. अचानक पूरपरिस्थिती निर्माण हाेताच तत्काळ पाेलिस अायुक्त एस. जगन्नाथन यांनी वाहतूक नियंत्रण कक्षाचा ताबा घेत उपअायुक्त लक्ष्मीकांत पाटील, उपअायुक्त श्रीकांत धिवरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी अाणि कर्मचारी रस्त्यावर उतरले. मंगळवारी पहाटेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत हे सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गाेदाकाठाचा ताबा घेत मदतकार्य हाती घेतले.

मंगळवारी दुपारी पूरस्थिती धाेक्याची पातळी गाठत असतानाच अायुक्त जगन्नाथन यांनी तत्काळ उपअायुक्त, वरिष्ठ निरीक्षकांना बिनतारी संदेशयंत्रणेद्वारे सुचना दिल्या. तातडीने चाेपडा लाॅन्स, रामवाडीपूल, घारपुरे घाट, अासामाराबापू पूलाकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक इतरत्र वळविण्याचे अादेश दिले. त्यापाठाेपाठ उंटवाडीपूलापर्यंत पाणी पाेहचल्याने नासर्डी नदीचा प्रवाह इतरत्र वाहू लागताच अंबड अाणि गंगापूर पाेलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना अाणि वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले. दाेन्ही बाजूची वाहतूक बंद करतानाच रस्त्यात अडकलेल्या वाहनधारकांना बाजूला करण्याच्याही सुचना दिल्या. त्याचबराेबर उपअायुक्त पाटील यांनी सहायक अायुकत डाॅ. राजू भुजबळ यांच्यासह सरकारवाडा, पंचवटी, भद्रकाली पाेलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांसह कर्मचाऱ्यांनाही गाेदाकाठासह पूल भागत गस्त घालण्यास सांगितले. त्याचबराेबर कपालेश्वर, खांदवेसभागृह, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, अहिल्यादेवी हाेळकर पूलावरील रहिवासी साेसायट्यांमधय्े जावून घराबाहेर पडण्याच्या ध्वनीक्षेपकावरून सुचना दिल्या. रस्त्े माेकळे करा, दक्षता घ्या याबाबत अावाहन केले जात हाेते.

अनेकांचे वाचले प्राण दरम्यान,पाेलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांचे अादेश येतील मगच मदत कार्याला बाहेर पडायचे, अशी भूमिका घेता जसा संदेश प्राप्त हाेईल तशी तातडीने मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली जात हाेती. अंबड पाेलिसांच्या पथकाने उंटवाडी येथे एका दीड वर्षाच्या मुलाला, तर वाहतूक पाेलिसांनी दुचाकीस्वारास अाणि पंचवटी, सरकारवाडा पाेलिसांनी दहा जणांना पाण्यातून बाहेर काढत त्यांचे प्राण वाचविले. पाेलिसांनी दाखविलेल्या तप्परतेबद्दल रहिवाश्यांकडून समाधान व्यक्त केले. याबाबत उपअायुक्त लक्ष््मीकांत पाटील यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सांघिक यशामुळेच हे शक्य झाल्याचेही मत व्यक्त केले. १३ पाेलिस ठाण्याचे प्रत्येकी १०० ते१२५ कर्मचारी अायुक्तालयातील २०० अधिकारी पुर्णवेळ रस्त्यावर असल्याचेही सांगण्यात अाले.

पाेलिस अायुक्तालयातील नियंत्रण कक्षातील महत्वाच्या क्रमांकांसह नागरिकांना उपलब्ध करून दिलेल्या हेल्पलाईन क्रमांसह जवळपास १२ फाेनच्या लाईन पुर्णपणे व्यस्त हाेत्या. जणू काही अग्निशनमन दलाचे कार्यालय अाहे, अशी परिस्थिती निर्माण झाली हाेती. फाेन उचलताचा पाेलिसांनी काही विचारण्यापुर्वीच साहेब अामच्या साेसायटीत पाणी घुसले, पहिल्या मजल्यापर्यंत पाणी पाेहचले, अाम्हाला वाचवा, दाेरखंड, बाेटी पाठवा, येथे शाॅटसर्कीट हाेतेय, झाड पडले, पूलावरून पाणी चालले, द्वारका चाैक वाहतूक काेंडी झाली, रूग्णवाहिका काेणत्या मार्गाने न्यायची अशा स्वरूपाची चाैकशी करून मदत मागितली जात हाेती. त्याप्रमाणे तत्काळ संबंधित पाॅईंटवरच्या पाेलिस निरीक्षकांना बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे माहिती कळविण्यात येत हाेती.
बातम्या आणखी आहेत...