आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांच्या झडती सत्रात 85 गुन्हेगारांवर कारवाई

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिसांनी राबवलेल्या झडती सत्रात तब्बल 85 गुन्हेगारांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यात गुरुवारी गंजमाळ झोपडपट्टी भागात झडतीसत्रात 18 जणांना अटक करण्यात आली आहे.
पंचवटीतील फुलेनगर, नवनाथनगर भागात व जुन्या नाशकात ठाकरे गल्ली, पंचशीलनगर, चौकमंडई, कथडा, गंजमाळ झोपडपट्टी, एकलहरा व गंगापूररोड परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये शोध मोहीम राबवण्यात आली. तब्बल 85 गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. त्यातील 50हून अधिक संशयितांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून चांगल्या वर्तणुकीचा बॉँड लिहून घेण्यात आला असून, उर्वरित संशयितांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
नाशिकरोडला मोहीम - चार गुन्हेगारांचा हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, नाशिकरोडच्या रेकॉर्डवरील 55 गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सुब्रतो सृष्टीचरण दास (रा. देवळालीगाव) याच्या खुनाचे सत्य उलगडले असून, अंजली दास ही मयताची तिसरी पत्नी आहे. तिनेच मुकेश कागडा (32, रा. सिन्नरफाटा), शंकर कापसे (22, निफाड) फ्रान्सिस ऊर्फ पप्पू फासगे (23, रा. रोकडोबावाडी) त्यांच्या मदतीने दोरीने गळा आवळून खून केला. पतीच्या मृत्यूनंतर विम्याचे पाच लाख रुपये मिळण्याकरिता पत्नीनेच खून केल्याचे डॉ. स्वामी यांनी सांगितले. तसेच आसरफ अब्दुल हमीद शेख (27, सुभाषरोड) याच्याकडून घरफोडीतील 11 गॅस सिलिंडर असा ऐवज हस्तगत करून तीन गुन्हे उघडकीस आल्याचे त्यांनी सांगितले.