आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिझनेस बँकेवर पोलिसांचा मुदत ठेव प्रकरणी छापा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - बिझनेस बँकेतील मुदत ठेवीच्या बदल्यात बनावट अकाउंट उघडून ठेवीच्या रकमेचा परस्पर वापर केल्याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी बँकेच्या मुख्य शाखेवर छापा टाकून तपासासाठी आवश्यक कागदपत्रांचा शोध घेतला. तीन तासांच्या कारवाईच्या माहितीबाबत पोलिसांनी गुप्तता पाळली.

बँकेचे ठेवीदार असगर रमझान खान यांनी एप्रिल २०१५ रोजी केलेल्या तक्रारीनुसार, सन २००१ ते २००३ दरम्यान त्यांच्या मुदत ठेवीच्या बदल्यात बनावट एलएनएफडीआर अकाउंट (क्र. ६११) उघडून त्यांच्या नावावरील २५ लाख रुपये संचालक मंडळ आणि व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांनी स्वत:च्या फायद्यासाठी दोन वेळेस काढून पुन्हा बँकेत भरले. गुन्ह्याच्या तपासासाठी काही महिन्यांपासून पोलिस बँकेकडे आवश्यक कागदपत्रांची मागणी करीत असताना सहकार्य केले जात नसल्याचे सांगत अखेर पोलिसांनी छापा टाकला.

पहिलीच कारवाई
वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत, सहायक सुजित मुढे यांच्या नेतृत्वाखाली सायबरतज्ज्ञ चांदुरस्ते, लेखापरीक्षक, गुन्हे शोध पथक अशा उपनगर देवळाली कॅम्पच्या २० सदस्यांच्या संयुक्त पथकाने रेकॉर्ड रूमची झडती घेऊन कागदपत्रांची तपासणी केली. बँक महत्त्वाची कागदपत्रे, तसेच पुरावाही देत नसल्याने तपासाचा भाग म्हणून झडती घ्यावी लागल्याचे पोलिसांनी सांगितले.