आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लावणीच्या नावाखाली अर्धनग्नावस्थेत धांगडधिंगा; बीभत्स कृत्य करणारे तरुण, तरुणी ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इगतपुरी- बलायदुरी  येथील रेन फॉरेस्ट रिसॉर्टमध्ये  मंगळवारी रात्री  इगतपुरी पोलिसांनी छापा टाकून धांगडधिंगा घालणाऱ्या मद्यधुंद अवस्थेतील अाठ तरुणांसह सात तरुणींना ताब्यात घेतले. डीजे वाहतुकीसाठी लागणाऱ्या पिकअपसह साहित्य व एक कार पोलिसांनी जप्त केली आहे. सहा महिन्यांपूर्वी इगतपुरीजवळीलच मिस्टिक व्हॅली येथे बॅचलर  पार्टीवर छापा टाकून  बारबालांसह तरुणांवर कारवाई करण्यात आली होती.   

मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी टोलनाक्यापासून ४  किमी अंतरावर असलेल्या  इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी शिवारातील  रेन फॉरेस्ट रिसॉर्ट येथे नाशिक येथील डीजेचालक संजय सोनवणे याने  लावणीच्या कार्यक्रमाचे निमित्त सांगून काही  तरुणींना आमंत्रित केले होते. या लावणीच्या कार्यक्रमासाठी  जी. एम. बायोसाइटस‌् प्रा. लिमिटेड कंपनी कात्रज (पुणे) येथील पाच संचालकही बोलावण्यात आले होते. मंगळवारी सायंकाळपासून तयारी सुरू होती. मात्र, लावणीऐवजी विचित्र प्रकार सुरू असल्याचे स्थानिक तरुणांना दिसून आले. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. रात्री नऊच्या सुमारास पाेलिसांनी छापा टाकला तेव्हा  विनापरवाना महिलांची नृत्य पार्टी सुरू हाेती. तसेच काही तरुण या तरुणींसाेबत अशाेभनीय वर्तन करताना अाढळून अाले. याप्रकरणी अाठ तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात अाला. तसेच तरुणींसह  संशयित आरोपींची रुग्णालयात तपासणी करण्यात आली.
 
अाराेपींची नावे  
प्रशांत काशीनाथ सोंडकर (२७, रा. दिडहार, ता. भोर), विश्वास विठ्ठल सोंडकर (४५, रा. मांगलेवाडी, पुणे), गंगाधर भाऊसाहेब शिंदे (४२, रा. मनोली, ता. संगमनेर), अनंत हरिहर भाकरे (५१, रा. लिबर्टी हाइट्स, नाशिक), उमेश जिभाऊ शेवाळे या सर्व जीएम बायोसाइटस कंपनीच्या संचालकांसह डीजेचालक संजय वसंत सोनवणे (३८, रा. पाथर्डी फाटा, नाशिक),  प्रथमेश संजय सोनवणे (२०), रामकृष्ण एकनाथ सांगळे (२०, रा. नाशिक) यांना  पकडण्यात आले.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... पोलिसांच्या छापेमारीनंतर समोर आलेले फोटो आणि व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...