आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात स्पा सेंटरच्‍या नावाखाली देहविक्री व्यवसाय, आठ तरुणींसह पाच ग्राहकांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकमधील स्पा सेंटरमध्ये पकडल्यानंतर ताेंड लपवताना तरुणी. - Divya Marathi
नाशिकमधील स्पा सेंटरमध्ये पकडल्यानंतर ताेंड लपवताना तरुणी.
नाशिक - मसाज सेंटरच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय चालवणाऱ्या नाशकातील ‘एक्झाॅटिक स्पा’वर पाेलिसांनी बुधवारी (दि. २४) छापा टाकत अाठ तरुणींसह पाच ग्राहकांना अटक केली अाहे. विशेष म्हणजे, चार महिन्यांपूर्वी याच ठिकाणी अशाच प्रकारे पाेलिसांनी बनावट ग्राहक पाठवून मसाज पार्लरच्या नावाने सुरू असलेला कुंटणखाना उघडकीस अाणला हाेता. त्यामुळे संशयित स्पा चालकाला नेमका काेणाचा अाशीर्वाद अाहे, याची चर्चा सुरू झाली अाहे.
 
शहरातील कॉलेज रोडवरील महात्मानगर, तसेच गंगापूरराेड यासारख्या उच्चभ्रू वसाहत समजल्या जाणाऱ्या रहिवासी भागातच स्पा अाणि मसाज पार्लरच्या नावाखाली सर्रास कुंटणखाना चालवला जात असल्याचे पाेलिसांच्याच कारवाईतून वारंवार उघडकीस येत अाहे. तरीही संबंधित व्यावसायिक महिना-दाेन महिने व्यवसाय बंद करून पुन्हा हा उद्योग सुरू करत असल्याची धक्कादायक बाब समाेर येत अाहे. बुधवारी दुपारी वाजेच्या सुमारास काॅलेज राेडवरील हाॅलमार्क चाैकातील माॅलला लागून असलेल्या इमारतीत ‘एक्झाॅटिक स्पा’ येथे अवैध कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलिस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना मिळाली हाेती.

त्यांनी गंगापूर पाेलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिली. त्यानुसार बनावट ग्राहक म्हणून पाेलिस कर्मचाऱ्यालाच ‘स्पा’मध्ये पाठवले असता मिळालेली माहिती खरी ठरली. दबा धरून बसलेल्या पाेलिस पथकाने तेथे छापा टाकला. या ठिकाणी काउंटरवर अल्पवयीन मुलाची चाैकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. महिला पाेलिसांसह कर्मचाऱ्यांनी स्पा सेंटरमध्येच धाव घेतल्यानंतर वेगवेगळ्या ‘कंपार्टमेंट’मध्ये आठ तरुणी पाच युवक ग्राहक अाढळले. पाेलिसांनी या तरुणींसह ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली अाहे. स्पा चालक संशयित तरुणींना पैशांचे अामिष दाखवून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करत असल्याचे उघडकीस अाले अाहे.
 
स्पा चालक फरार
घटनेनंतर स्पा चालक परेश सुराणा फरार झाला असून त्याच्याविरुद्ध अातापर्यंत अशाच प्रकारे अवैध व्यवसाय केल्याप्रकरणी गुन्हे दाखल अाहेत. त्याच्यासह स्पासाठी भाड्याने गाळा देणाऱ्या मालकांचा शाेध घेऊन त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
अशा व्यवसायांवर करडी नजर
स्पाचे गाळे न्यायालयाच्या अादेशान्वये सील करण्यात अाले असून यापुढे शहरात कुठल्याही भागात मसाज पार्लर स्पाच्या नावाने चालणाऱ्या व्यवसायांवर करडी नजर ठेवली जाणार अाहे. नागरिकांनीही थेट तक्रारी कराव्यात.
- लक्ष्मीकांत पाटील, पाेलिस उपअायुक्त नाशिक
 
बातम्या आणखी आहेत...