आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मटका अड्ड्यावर छापा; तीन लाखांचा ऐवज जप्त, शांतीनगरात पोलिसांकडून कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- अंबडच्या शांतीनगरात अवैधरीत्या सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर परिमंडल-२ च्या पोलिस अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात सुमारे लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या वेळी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून, या छाप्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहे.

शुक्रवारी सायंकाळी परिमंडल-२ चे उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहायक आयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. पोलिसांना या धंद्याबाबत माहिती मिळाली होती. छाप्यावेळी पोलिसांनी मोबाईल, २४ हजार ८४० रुपयांची रोकड, २०० कॅल्क्युलेटर, दुचाकी असा लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईत कमलेश कांबळे, संदीप पवार, अनिल कांबळे, प्रवीण सावंत, किशोर शिंदे, इम्तियाज अन्सारी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. शहरातील विविध भागात सुरू असलेल्या छापा सत्रांमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले असून, अनेकांनी पळ काढला आहे. या धंद्यांमुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले होते. या कारवाईचे स्वागत होत असून, अंबड भंगार बाजारातही पोलिसांनी अशीच धडक मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

कठोर कारवाई करू
वरिष्ठांच्यामार्गदर्शनाखालीकारवाई सुरू आहे. शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी आम्ही कठोर पावले उचलली आहेत. कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत, अवैध बेकायदेशीर कामे करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. अतुल झेंडे, सहायकआयुक्त